मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sahar Shaikh : एमआयएम नगरसेविका सहर शेख यांचा पोलिसांकडे लेखी माफीनामा; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रकरणावर पडदा

Mumbra Police On Sahar Shaikh : "तिरंग्यासाठी जगू आणि मरू"; किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कडक कारवाई; भविष्यात चिथावणीखोर भाषण केल्यास कारवाईचा इशारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sahar Shaikh : एमआयएम नगरसेविका सहर शेख यांचा पोलिसांकडे लेखी माफीनामा; वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी प्रकरणावर पडदा

Mumbra Police On Sahar Shaikh : "तिरंग्यासाठी जगू आणि मरू"; किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कडक कारवाई; भविष्यात चिथावणीखोर भाषण केल्यास कारवाईचा इशारा

मुंब्रा l ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा येथून निवडून आलेल्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अखेर पोलिसांकडे लेखी माफीनामा सादर केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत शेख यांनी माफी मागितल्याने हे प्रकरण आता दप्तरी नोंदवण्यात आले आहे.

काय होता वाद?

निवडणुकीतील विजयानंतर एका जाहीर सभेत भाषण करताना सहर शेख यांनी, “कैसा हराया, अभी हम लोगो को मुंब्रा को पुरा हरा कर देना है” असे विधान केले होते. या विधानाचा संबंध 'हिरवा रंग' आणि धर्माशी जोडून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांनी केला होता. या तक्रारींची दखल घेत मुंब्रा पोलिसांनी सहर शेख यांना नोटीस बजावून चौकशीसाठी पाचारण केले होते.

माफीनाम्यात काय म्हटले?

23 जानेवारी 2026 रोजी सहर शेख यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे आपला लेखी माफीनामा सोपवला. त्यात त्यांनी खालील खुलासे केले आहेत

"हरा कर देना है" हे वाक्य केवळ पक्षाचा झेंडा आणि निशाणीच्या (हिरवा रंग) संदर्भात होते. "आम्ही तिरंग्यासाठी जगणार आणि तिरंग्यासाठीच मरणार आहोत." कोणाचेही मन दुखावण्याचा किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आपला हेतू नव्हता. तरीही वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर जाहीर माफी मागत आहे.

किरीट सोमय्यांची पोलिसांशी भेट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याला भेट देऊन या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल मागितला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सोमय्या यांना लेखी पत्राद्वारे सहर शेख यांच्या माफीनाम्याची माहिती दिली. पोलिसांनी स्पष्ट केले की, सध्या हा माफीनामा स्वीकारून हे प्रकरण थांबवण्यात आले आहे. मात्र, भविष्यात अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य पुन्हा केल्यास सहर शेख यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी तजवीज पोलिसांनी ठेवली आहे.

शेअर करा