मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rupali Thombare : रुपाली पाटील ठोंबरे यांचा राष्ट्रवादीला रामराम! - पक्षांतर्गत वाद आणि स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळल्याने अखेर राजीनामा

NCP Leader Rupali Thombare : अजित पवारांकडे सुपूर्द केला राजीनामा; रुपाली चाकणकर यांच्याशी थेट 'ख्वाडा' वादाची चर्चा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sushma-Andhare-on-Rupali-Thombare

NCP Leader Rupali Thombare : अजित पवारांकडे सुपूर्द केला राजीनामा; रुपाली चाकणकर यांच्याशी थेट 'ख्वाडा' वादाची चर्चा

पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आक्रमक नेत्या आणि पुणे शहर कार्याध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे Rupali Thombare यांनी पक्षातील वाढत्या नाराजीमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा थेट पक्षश्रेष्ठी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे रुपाली पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

माजी नगरसेविका असलेल्या रुपाली पाटील यांनी 2021 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

'रुपाली विरुद्ध रुपाली' वाद

रुपाली पाटील यांच्या राजीनाम्यामागे पक्षांतर्गत वाद हे प्रमुख कारण मानले जात आहे. विशेषतः, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यातील अंतर्गत वाद काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आले होते.

'ख्वाडा' इशारा: बीडमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात न्याय न मिळाल्याचा दावा करत रुपाली पाटील यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी त्यांनी, "आमचा इतिहास अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही, तर गरज पडल्यास 'ख्वाडा' करणाऱ्यांचा आहे," असा इशारा रूपाली चाकणकर यांना दिला होता.

प्रचारक आणि प्रवक्त्यांच्या यादीतून डच्चू

रुपाली पाटील यांना पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही वगळण्यात आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत रुपाली पाटील यांना स्थान मिळाले नव्हते, तसेच त्यांना प्रवक्त्यांच्या यादीतूनही यापूर्वीच वगळण्यात आले होते. त्यामुळे त्यांची पक्षातून गच्छंती निश्चित मानली जात होती.

दरम्यान, नुकतीच रुपाली पाटील यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट राजकीय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी, आता राजीनामा दिल्यानंतर त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर करा