मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Rupali Patil Thombare : "मेधा कुलकर्णी या अशिक्षित बाईने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये!"

Rupali Patil Thombare On Megha Kulkarni : शनिवारवाडा शुद्धीकरण प्रकरणी रुपाली ठोंबरे-पाटलांचा भाजप खासदारांवर हल्लाबोल; 'त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा' मागणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Rupali Patil Thombare : "मेधा कुलकर्णी या अशिक्षित बाईने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये!"

Rupali Patil Thombare On Megha Kulkarni : शनिवारवाडा शुद्धीकरण प्रकरणी रुपाली ठोंबरे-पाटलांचा भाजप खासदारांवर हल्लाबोल; 'त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा' मागणी

पुणे :- पुण्यातील शनिवारवाड्यात मुस्लीम महिलांनी नमाज पठण Pune Shaniwarwada केल्याच्या व्हिडिओवरून निर्माण झालेल्या वादानंतर, भाजप खासदार मेधा कुलकर्णी Megha Kulkarni यांनी शनिवारी (19 ऑक्टोबर) हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेल्या 'शुद्धीकरण' मोहिमेमुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मेधा कुलकर्णी यांनी नमाज पठण झालेल्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती शेणाने सारवली आणि शिववंदना केली होती.

या कृत्यामुळे विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली असताना, आता महायुतीतील सहकारी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे.

रुपाली ठोंबरेंची कडवट टीका

रुपाली पाटील ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर अत्यंत कडवट टीका केली. त्या म्हणाल्या, “मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या अशिक्षित बाईने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.”

ठोंबरे-पाटील यांनी कुलकर्णी यांच्यावर थेट आरोप केला की, "त्यांच्या या नौटंकीमुळे पुण्यात हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होत आहे आणि समाजातील सामाजिक सलोखा बिघडतोय. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे."

'शनिवारवाडा बुरसटलेल्या बुद्धीचं प्रतीक नाही!'

रुपाली ठोंबरे यांनी मेधा कुलकर्णी यांच्या कृतीला 'बेकायदेशीर' ठरवले. त्या म्हणाल्या, "आपल्या धर्माचा स्वाभिमान असणं ही वेगळी गोष्ट आहे आणि दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावणं वेगळं. ते करत असताना दुसऱ्या धर्माच्या भावना दुखावत असतील, तर तो कायद्याने गुन्हा आहे. मेधा कुलकर्णी यांचं कृत्य बेकायदेशीर आहे."

त्यांनी पुढे म्हटले की, "मेधा कुलकर्णी शिक्षिका असल्या तरी त्यांना ही गोष्ट माहीत नसेल की, शनिवारवाडा हे मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक आहे. शनिवारवाडा मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या बुरसटलेल्या बुद्धीचं प्रतीक नाही."

रुपाली ठोंबरे यांनी यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मेधा कुलकर्णी यांना तात्काळ समज द्यावी, अशी मागणीही केली आहे.

शेअर करा