मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : रिक्षा – टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत

Mumbai News : मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली मुदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवून एक वर्ष केली आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

रिक्षा – टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत
रिक्षा – टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत

देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय


Mumbai News : मुंबई : महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली मुदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढवून एक वर्ष केली आहे. त्यामुळे महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजपमधील मतभेद पुन्हा समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, परिवहनमंत्र्यांनी १५ ऑगस्टनंतर मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. मात्र, रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या निर्णयात बदल करत एक वर्षाची मुदतवाढ दिली.https://maharashtramirror.com/ Mumbai News
रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ही मागणी मान्य करत फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली. या कालावधीत चालकांवर मराठी न आल्याच्या कारणावरून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.https://maharashtramirror.com/ Mumbai News
'जुजबी मराठी शिकणे आवश्यक, मात्र वेळ देणे गरजेचे'
महाराष्ट्रात राहायचे असेल आणि येथे व्यवसाय करायचा असेल तर जुजबी मराठी शिकणे आवश्यक आहे, अशी भूमिका कायम असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. रिक्षा आणि टॅक्सी चालक मराठी शिकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, वेगवेगळ्या वयोगटातील चालकांना कमी कालावधीत मराठी शिकणे शक्य नसल्याने त्यांना आणखी वेळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चालकांनी स्वतःहून मराठी शिकण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे त्यांना ही संधी देणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. या एका वर्षाच्या कालावधीत चालकांनी जुजबी मराठी शिकावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शेअर करा