मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : "शहरांची वाट लागलीय आणि कोणी बघायलाही तयार नाही!" – राज ठाकरे यांचा संताप

•Raj Thackeray On Mumbai Train Accident रेल्वे अपघातावरून परप्रांतीयांवर ठपका; टाऊन प्लॅनिंगचा अभाव आणि व्यवस्थेचा बोजवारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray

•Raj Thackeray On Mumbai Train Accident रेल्वे अपघातावरून परप्रांतीयांवर ठपका; टाऊन प्लॅनिंगचा अभाव आणि व्यवस्थेचा बोजवारा

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत घडलेल्या रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून तीव्र प्रतिक्रिया दिली. या दुर्घटनेसाठी त्यांनी शहरांवर आदळणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांना जबाबदार धरत संपूर्ण वाहतूक आणि नागरी व्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.

“आपल्याकडे टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्टच नाही. कुठेही रस्ते नाहीत, पार्किंगची सोय नाही, फायर ब्रिगेडची गाडीही पोहोचू शकत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया देत त्यांनी शासनाच्या शहर नियोजनावर आक्षेप घेतला.

मुंबईतील अपघातावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “ही रेल्वे चालतेच कशी याचंच आश्चर्य वाटतं. मेट्रो आणि मोनो रेल असूनही गाड्यांचे रजिस्ट्रेशन कमी झालंय का? मग हे उपाय कशासाठी?” असे सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारच्या 'योजनेशिवाय अंमलबजावणी'वर बोट ठेवले. लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावण्याच्या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले, “त्या दरवाज्यांनी लोक गुदमरून मरतील, एवढी गर्दी आहे!”

माध्यमांवरही ताशेरे ओढताना त्यांनी विचारले, “उद्धव ठाकरे आणि माझ्या एकत्र येण्याच्या बातम्यांना एवढं महत्व देता, पण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या बातम्या कुठे आहेत?” पत्रकारांनी शहरांतील मूळ प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावं, असं आवाहन त्यांनी केलं.

राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले आणि रेल्वे मंत्रालयाने या भीषण अपघाताची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी केली. “परदेशातून मंत्री काय पाहून येतात? कमीत कमी तिथले विचार तरी इथे आणा,” असे म्हणत त्यांनी प्रशासकीय उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: Ajit Pawar : लोकलमध्ये मृत्यूचं आमंत्रण! दिवा-मुंब्रा अपघातात सहा जणांचा बळी

शेअर करा