मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : तलवार उंचावल्याप्रकरणी राज ठाकरे आज ठाणे न्यायालयात हजर राहणार! - एप्रिल 2022 मधील 'उत्तर सभे'तील घटनेची सुनावणी

•मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray : तलवार उंचावल्याप्रकरणी राज ठाकरे आज ठाणे न्यायालयात हजर राहणार! - एप्रिल 2022 मधील 'उत्तर सभे'तील घटनेची सुनावणी

•मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

ठाणे :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज (गुरुवार, 11 डिसेंबर) ठाणे न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. ठाण्यातील एका सभेदरम्यान व्यासपीठावर तलवार उंचावल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या सुनावणीसाठी ते न्यायालयात उपस्थित राहणार आहेत.

गुन्हा दाखल होण्याचे कारण

एप्रिल 2022 मध्ये राज ठाकरे यांनी ठाण्यात 'उत्तर सभा' घेतली होती. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथील चौकात पार पडलेल्या या सभेमध्ये राज ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना तलवार भेट दिली होती. यावेळी राज ठाकरे यांनी व्यासपीठावर तलवार म्यानातून काढून हवेत उंचावली होती.

या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसे नेते अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह एकूण 7 ते 8 जणांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.आज (गुरुवार) या खटल्याच्या सुनावणीसाठी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर राहणार असल्याने मनसे कार्यकर्त्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Mira Bhayandar Bribe News : 16 हजारांची लाच घेताना मीरा भाईंदरचे 2 पालिका कर्मचारी रंगेहाथ अटकेत! - अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्याची धमकी देणे पडले महागात

शेअर करा