मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raj Thackeray : "शिवतीर्थावर येऊ नका, मी मुंबईबाहेर असेन" – कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचा संदेश

Raj Thackeray Birthday Post : वाढदिवसाला भेट शक्य नाही, पण प्रेम आणि शुभेच्छा हाच माझा खरा ठेवा!" – राज ठाकरे

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raj Thackeray

Raj Thackeray Birthday Post : वाढदिवसाला भेट शक्य नाही, पण प्रेम आणि शुभेच्छा हाच माझा खरा ठेवा!" – राज ठाकरे

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray Post यांनी आपल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना एक भावनिक संदेश दिला आहे. 14 जून 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शिवतीर्थावर न येण्याचे’ आवाहन करत त्यांनी सांगितले की, त्या दिवशी ते सहकुटुंब मुंबईबाहेर असतील.

यंदा 14 जूनला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय; कार्यकर्त्यांना लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन

राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, वाढदिवस साजरा न करण्यामागे कोणतेही खास कारण नाही, आणि कोणीही त्यामागे अर्थ काढू नये. आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाला त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं मिळवलेलं संपत्ती ठरवले आणि सांगितले की, वाढदिवशी प्रत्यक्ष भेट न होऊ शकली तरी शुभेच्छांची उब त्यांच्यासोबत राहील.

त्यांनी कार्यकर्त्यांना असेही सुचवले की, "या दिवशी जर तुम्ही तुमच्या भागात काही लोकोपयोगी उपक्रम राबवले, तर मला वाटेल की तुम्ही माझा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा केला."

शेवटी, राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आणि लवकरच प्रत्यक्ष भेटीचं आश्वासनही दिलं.

शेअर करा