मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Raigad Police: रायगड पोलीस अधीक्षकपदी आंचल दलालअवैध धंदे रोखण्याचे आव्हान !

रायगड प्रतिनिधी : सोमनाथ घार्गे रायगडचे पोलीस अधीक्षक असताना रायगड जिल्ह्यात लेट नाईट अवैध लेडीज बार, मटका चिमणी पाखर जुगार, डिझेल तस्करी यासारखे अवैध धंदे तेजीत सुरु होते अनेकदा कारवाई होऊनही धंदे घार्गेच्या आशीर्वादाने सुरूच होते मात्र आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी क्रिय

V
Vivek

1 मिनिट वाचन

Raigad Police: रायगड पोलीस अधीक्षकपदी आंचल दलालअवैध धंदे रोखण्याचे आव्हान !

रायगड प्रतिनिधी : सोमनाथ घार्गे रायगडचे पोलीस अधीक्षक असताना रायगड जिल्ह्यात लेट नाईट अवैध लेडीज बार, मटका चिमणी पाखर जुगार, डिझेल तस्करी यासारखे अवैध धंदे तेजीत सुरु होते अनेकदा कारवाई होऊनही धंदे घार्गेच्या आशीर्वादाने सुरूच होते मात्र आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी क्रियाशक्तीच्या हातात रायगड पोलीस Raigad Police CP अधीक्षकांचा कारभार दिला असून आंचल दलाल यांची रायगड जिल्ह्याच्या नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. दलाल यांनी यापूर्वी पोलीस उपायुक्तपदाचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केला असून त्यांच्या राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक राखण्याचे काम केले जात होते. दलाल यांच्यापुढे रायगड जिल्ह्यातील प्रमुख डिझेल तस्करी व मटका चिमणी पाखर जुगार रोखण्याचे आव्हान असून त्या हे आवाहन कसे पेलतात याकडे रायगडवासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली अहिल्या नगरला झाली आहे. त्यांच्या जागी लेडी सिंघम म्हणून ओळख असणाऱ्या आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या हाती आता रायगड पोलिसांचे सूत्र असणार आहे. कर्तव्यदक्ष कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांनी अल्पावधीतच ठसा उमटवला आहे.

२०१७ च्या युपीएससी परीक्षेत १३६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांची आयपीएससाठी निवड झाली. त्यांनी यासाठी खूप तयारी आणि संघर्ष केलेला आहे. त्या सोबतच याआधी त्यांनी रेल्वे मध्ये सुद्धा अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आंचल दलाल या मूळच्या उत्तर प्रदेशातील शामली या जिल्ह्यातील आहेत. आयपीएस म्हणून निवड होण्याआधी त्यांनी नागपूर येथे भारतीय रेल्वेतही कार्यभार पाहिला होता. सातारा येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यांची सांगली येथे बदली झाली होती. त्यानंतर सातारा येथे अपर पोलिस अधीक्षकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. साताऱ्यात असताना त्यांनी जुगाऱ्यांवर धडक कारवाया केल्या होत्या. तसेच महाविद्यालय परिसरात होणारे छेडछाडीचे प्रकारही त्यांनी आटोक्यात आणले होते. राज्य राखीव पोलीस दल पुणे या ठिकाणी समादेशक या पदावर त्या कार्यरत होत्या. त्यांना रायगड पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी गृह विभागाने सोपवली आहे. त्यांचे पती आणि बंधू दोघेही सनदी अधिकारी आहेत.

शेअर करा