मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Police News : गुंड गजा मारणेबरोबर ‘मटणपार्टी’ करणाऱ्या पोलिसांचे निलंबन

Pune Police With Gaja Marne ; पुण्यातील प्रसिद्ध गुंडा गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना मटण पार्टी करणाऱ्या पोलिसांना चांगलेच भोवलं

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune Police News : गुंड गजा मारणेबरोबर ‘मटणपार्टी’ करणाऱ्या पोलिसांचे निलंबन

Pune Police With Gaja Marne ; पुण्यातील प्रसिद्ध गुंडा गजा मारणे याला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेताना मटण पार्टी करणाऱ्या पोलिसांना चांगलेच भोवलं

पुणे :- येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना गुंड गजा मारणे याने ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याची माहिती समोर आली आहे.मारणेच्या मटण पार्टीची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी चौकशी केली. चौकशीत दोषी आढळलेल्या सहायक निरीक्षकासह सहा जणांना निलंबित करण्याचा आदेश त्यांनी दिला. तसेच मारणेला ढाब्यावर भेटणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. Pune Police Suspended 5 In Gajanan Marne Connection

कोथरूडमध्ये दुचाकीस्वाराला मारहाण केल्याच्या प्रकरणात मारणे आणि साथीदार येरवडा कारागृहात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव मारणेला सांगली येथील कारागृहात नेण्यात येत होते. त्या वेळी पोलीस बंदोबस्तावर सहायक पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी होते. वाटेत एका ढाब्यावर मारणेची व्हॅन थांबविण्यात आली.मारणेला तेथे सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते हे भेटले. विशाल धुमाळ याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पाच पोलीस कर्मचारी यांच्यासह त्याला ढाब्यावर भेटणाऱ्या सराईतवर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शेअर करा