मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune News : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला, 60 जण जखमी

• शिवनेरी किल्ल्यावर तरुणांच्या निष्काळजीपणामुळे मधमाशांचा हल्ला, 60 जण जखमी.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pune News : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला, 60 जण जखमी

•शिवनेरी किल्ल्यावर तरुणांच्या निष्काळजीपणामुळे मधमाशांचा हल्ला, 60 जण जखमी. नैसर्गिक वास्तूंमध्ये छेडछाड करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पुणे :- पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर रविवारी (16 मार्च) मधमाशांच्या हल्ल्यामुळे गोंधळ उडाला. या हल्ल्यात सुमारे 60 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिली.या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिली. शिवनेरी किल्ला हे थोर मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे आणि पुण्यापासून सुमारे 90 किमी अंतरावर जुन्नर तालुक्यात आहे. या ऐतिहासिक स्थळावर दररोज शेकडो पर्यटक येतात.

जुन्नर वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी सांगितले की, किल्ल्यात असलेल्या शिव मंदिराजवळ ही घटना घडली. ते म्हणाले, "प्राथमिक तपास आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणांच्या टोळक्याने मधमाश्यांच्या पोळावर दगडफेक केली, ज्यामुळे मधमाश्या उठल्या आणि त्यांनी तेथे उपस्थित लोकांवर हल्ला केला."

या हल्ल्यात सुमारे 60 लोक मधमाशांच्या डंखाचे बळी ठरले, त्यापैकी 50 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींवर उपचार करण्यात आले असून ते धोक्याबाहेर असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. सर्व जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

हेही वाचा: Mumbai Robbery News : ज्येष्ठ महिलेच्या हातातील पर्स चोरी करणाऱ्या चोरट्याला 5 तासात अटक

शेअर करा