मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune : तीन प्रकरणांमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ४४ लाखांची फसवणूक

pune : in Three Cases Under the Pretext of Investment Fraud of ₹44 Lakhs

DJ
Dattatraya Jadhav

2 मिनिट वाचन

pune : in Three Cases Under the Pretext of Investment Fraud of ₹44 Lakhs
pune : in Three Cases Under the Pretext of Investment Fraud of ₹44 Lakhs

निगडी, रावेत आणि सांगवी येथील घटना

पुणे : निगडी, रावेत आणि सांगवी येथे शेअर मार्केट आणि गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक केल्याची तीन प्रकरणे उघडकीस आली आहेत. या तीन प्रकरणांमध्ये ४४ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत जादा परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून १५ लाख ९१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना २२ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चिंचवड स्टेशन येथे घडली. या प्रकरणी एका महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार किर्ताना बंगेरा नावाची महिला आणि विविध बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला फेसबुकवर शेअर मार्केटची एक लिंक दिसली होती. ती ओपन केल्यानंतर त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड करण्यात आले. आरोपींनी फिर्यादीला एका ट्रेडिंग कंपनीत रजिस्ट्रेशन करायला लावून ऑनलाईन शेअर्स खरेदी-विक्रीतून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीने विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १५ लाख ९१ हजार ५० रुपये गुंतवले, मात्र त्यांना कोणतीही रक्कम परत मिळाली नाही. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा नफा मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून एका महिलेची २० लाख ५८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना २०२१ पासून २ एप्रिल २०२६ या कालावधीत रावेत परिसरात घडली. या प्रकरणी पीडित महिलेने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक जगदेवराव शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीला डिमॅट अकाऊंट उघडण्यास सांगून त्यातून फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. फिर्यादीला स्वतःच्या खात्यातून फायदा होत नसल्याचे पाहून आरोपीने "तुम्ही पैसे ट्रान्सफर करा, मी माझ्या डिमॅट अकाऊंटमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला वेळेवर नफा देतो" असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीकडून वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून एकूण २० लाख ५८ हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

तिसऱ्या घटनेत ॲप डाऊनलोड करायला लावून गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ९ लाख ७ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ही घटना डिसेंबर २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घडली. या प्रकरणी एका पुरुष फिर्यादीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कॅपिटल मॉंक्स कंपनीचे कर्मचारी जयेश पाटील, दोन महिला आरोपी आणि संबंधित लिंक व बँक खातेधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी फिर्यादीला एका कंपनीची माहिती देऊन गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी फिर्यादीला एक लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास भाग पाडले आणि त्याद्वारे ९ लाख ७ हजार ५०० रुपये गुंतवणूक करायला लावली. ॲपमध्ये ही रक्कम ९० लाखांवर गेल्याचे दिसत होते, मात्र ती काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे मिळाले नाहीत. त्यानंतर आरोपींनी संपर्क बंद करून फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

pune : in Three Cases Under the Pretext of Investment Fraud of ₹44 Lakhs

शेअर करा