मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Corporation on IT Radar | पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी इन्कम टॅक्सच्या 'रडार'वर

टीडीएसची तसेच आधार व पॅन लिंक न केल्याने त्याचा दंड वसूल

M
mubarak

1 मिनिट वाचन

Pune Corporation on it radar

  • टीडीएसची तसेच आधार व पॅन लिंक न केल्याने त्याचा दंड वसूल
  • पुणे, दि. १२ फेब्रुवारी, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Pune Corporation on IT Radar

    इन्कम टॅक्स विभागाच्या 'रडार'वर पुणे महापालिकेतील कर्मचारी आले आहेत. इन्कम टॅक्स विभागाने महापालिकेत लक्ष पुरविल्याने मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. टीडीएस तसेच आधार व पॅन लिंक न करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध दंड वसूल करण्यास सुरुवात झाली आहे. Pune Corporation on IT Radar

    टीडीएस तसेच आधार व पॅन लिंक न करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून रक्कम वसूल करू नये व महापालिका प्रशासनाने पगार अडवू नयेत अशी मागणी पीएमसी एम्प्लॉईज युनियनने अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने आणि महापालिकेने नेमलेल्या सल्लागाराच्या चुकीमुळे हा भूर्दंड लागला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केले आहे. Pune Corporation on IT Radar

    हेही वाचा: Kondhwa | अनाधिकृत बांधकामाचा बादशाह 'निझाम' समोर पुणे महानगरपालिका 'नतमस्तक'

    चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू झाल्यापासून त्यांच्यावर प्राप्ती कर लागू झाला आहे. पण अनेक कर्मचाऱ्यांना त्याबाबत काहीही माहिती नव्हते. त्यांना आधार व पॅन कार्ड लिंक करण्यासही सांगण्यात आले होते. पण त्याची देखील त्यांनी पूर्तता केली नाही.

    प्राप्तीकर विभागाने केलेल्या तपासणीमध्ये पुणे महापालिकेतील हजारो कर्मचाऱ्यांना याचा फटका बसला आहे. या विभागाने महापालिकेला यासंदर्भातील माहिती पाठवून दिली आहे. ही रक्कम हजारांपासून ते दीड लाखाच्या घरात आहे. प्राप्तीकर विभागाकडून ही रक्कम दोन हप्त्यात वसूल केली जाणार असल्याने अनेकांना तर दोन महिने पगार मिळणार नाही अशीच अवस्था आहे.

    हेही वाचा: Kondhwa Fake Document | कोंढव्यात पारगे नगर येथे 'बेकायदेशीर' बांधकामांना ऊत ! बनावट कागदपत्रांचे मोठे रॅकेट ?

    शेअर करा