मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ; जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Criticized BJP Poster : भाजप यांच्या जाहीरनाम्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

V
Vivek

1 मिनिट वाचन

भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो ; जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad Criticized BJP Poster : भाजप यांच्या जाहीरनाम्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांची टीका

मुंबई :- काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील तुलना करता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गाधी यांची मोजून केवळ चार छायाचित्रे आहेत. तर भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा PM Modi photo फोटो आहे. शिवाय प्रत्येक वाक्याच्या शेवटी लाएंगे, करेंगे म्हटलंय. मग दहा वर्ष काय केलं?

तुम्ही जाहीरनामे बारकाईने वाचलेत तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. इथे तुमच्या सोयीसाठी आणखी एक छोटीशी तुलना करून सांगतो. या जाहीरनाम्यांमधील तरूणांचा विभाग पाहिला तर असं दिसतं की भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे त्यांना फक्त पैसे खर्च करायचे आहेत. ते कसे आणि कुठे खर्च करायचेत याचा कोणताही मुद्देसूद उल्लेख नाही. परंतु काँग्रेसचा जाहीरनामा हा बेरोजगारीचं वास्तव मांडून त्यावर उपाय सुचवणारा, आर्थिक हिशेब देणारा धारणात्मक आणि महत्त्वाकांक्षी आहे.

तुम्हाला ठरवायचे आहे की विकासाच्या नावाने स्वत:च्या तिजो-या भरणा-या भाजपला मत द्यायचे की लोकाभिमुख योजना राबवणा-या 'इंडिया' आघाडीला.

भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. शिवाय प्रत्येक वाक्याच्या शेवटी लाएंगे, करेंगे म्हटलंय. मग दहा वर्ष काय केलं? असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्याची तुलना करत भाजपवर टीका केली आहे.

प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले, "काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्यातील तुलना करता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गाधी यांची मोजून केवळ चार छायाचित्रे आहेत. तर भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे. शिवाय प्रत्येक वाक्याच्या शेवटी लाएंगे, करेंगे म्हटलंय. मग दहा वर्ष काय केलं?" असे आव्हाड यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा: Maratha Reservation : पुढील महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर…', मनोज जरांगे यांनी पुन्हा दिला सरकारला इशारा

शेअर करा