मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pratap Sarnaik : मीनाक्षी शिंदेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा!"; प्रताप सरनाईकांच्या विधानाने शिंदे सेनेत मोठा राजकीय भूकंप

•Meenakshi Shinde resignation demand news update : प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी सरनाईकांनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली भावना; खासदार नरेश म्हस्केंचा विरोधकांना मुंबईतून आरोप करण्याऐवजी ठाण्यात येण्याचे पुन्हा आव्हान

V
Vivek

1 मिनिट वाचन

Pratap Sarnaik : मीनाक्षी शिंदेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा!"; प्रताप सरनाईकांच्या विधानाने शिंदे सेनेत मोठा राजकीय भूकंप

•Meenakshi Shinde resignation demand news update : प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी सरनाईकांनी उपमुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली भावना; खासदार नरेश म्हस्केंचा विरोधकांना मुंबईतून आरोप करण्याऐवजी ठाण्यात येण्याचे पुन्हा आव्हान

ठाणे :- ठाण्यातील ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचे प्रकरण आता महायुती आणि विशेषतः सत्ताधारी शिंदे सेनेच्या अंतर्गत वर्तुळातच पेटू लागले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणी अत्यंत खळबळजनक विधान करत, "प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मीनाक्षी शिंदे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे," असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. त्यांनी आपली ही वैयक्तिक भावना थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही मांडल्याचे सांगितल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

"राजकारण नको, पुराव्यांवर कारवाई व्हावी"; सरनाईकांचे तपासाला सहकार्याचे आवाहन

प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, पूर्णेकर कुटुंबाच्या दुःखाची महायुतीला पूर्ण जाणीव आहे. या प्रकरणाला राजकीय वळण न देता तपासात ज्यांच्याविरोधात पुरावे आढळतील, त्यांच्यावर पोलिसांनी कोणतीही गय न करता कडक कायदेशीर कारवाई केली पाहिजे. मात्र, चौकशीचा काळ चालू असताना निष्पक्ष तपासासाठी आणि पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी मीनाक्षी शिंदेंनी पदमुक्त होणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मंत्री सरनाईकांच्या या मागणीमुळे शिंदे सेनेमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईत बसून आरोप नका करू, ठाण्यात या"; खासदार नरेश म्हस्केंचा पलटवार

दुसऱ्या बाजूला, खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरील आरोपांचा तीव्र निषेध करत विरोधकांना पुन्हा एकदा आक्रमक प्रत्युत्तर दिले. "मुंबईत बसून पोकळ आरोप करण्याऐवजी विरोधकांनी ठाण्यात येऊन बोलावे, आम्हीही त्याच भाषेत उत्तर देऊ," असा इशारा त्यांनी दिला. पूर्णेकरांच्या मृत्यूनंतर विरोधक केवळ या घटनेचे राजकीय भांडवल करत असल्याचा आरोप करत, तणावपूर्ण वातावरणामुळेच एकनाथ शिंदे यांना कुटुंबीयांच्या भेटीपासून रोखण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांना पुरावे देऊन निष्पक्ष तपास होऊ द्यावा, अशी भूमिका म्हस्केंनी मांडली.

हेही वाचा: Naresh Mhaske : एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही! ; प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरून खासदार नरेश म्हस्केंचा विरोधकांना सज्जड दम

शेअर करा