मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Prashant Jagtap : प्रशांत जगतापांचा काँग्रेस प्रवेश निश्चित; पण उद्धव ठाकरेंच्या 'त्या' 9 मिनिटांच्या फोनची पुण्यात जोरदार चर्चा!

•"शिवसेनेत या, सन्मान राखू"; ठाकरेंची ऑफर नाकारत जगतापांनी धरला 'हात'

V
Vivek

1 मिनिट वाचन

Prashant Jagtap : प्रशांत जगतापांचा काँग्रेस प्रवेश निश्चित; पण उद्धव ठाकरेंच्या 'त्या' 9 मिनिटांच्या फोनची पुण्यात जोरदार चर्चा!

•"शिवसेनेत या, सन्मान राखू"; ठाकरेंची ऑफर नाकारत जगतापांनी धरला 'हात'

पुणे | पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार असल्याच्या निर्णयाला विरोध करत प्रशांत जगताप यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असतानाच, जगताप आज दुपारी 12 वाजता मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

उद्धव ठाकरेंचा 'तो' फोन आणि मोठी ऑफर

प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री उशिरा त्यांना फोन केला होता. या दोघांमध्ये तब्बल साडेनऊ मिनिटे चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जगतापांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले,"तुम्ही शिवसेनेत या, तुमचा योग्य सन्मान राखला जाईल. आम्ही भाजपसोबत कधीही जाणार नाही. पुण्याच्या भल्यासाठी तुम्ही आमच्यासोबत काम करू शकता."

जगतापांनी का नाकारली ठाकरेंची ऑफर?

उद्धव ठाकरेंच्या फोननंतर प्रशांत जगताप यांनी त्यांचे आभार मानले, मात्र आपला कल काँग्रेसकडेच असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याशी साडेनऊ मिनिटे बोलणे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यांनी माझी योग्यता समजून घेतली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहीन."जगताप यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, त्यांची विचारधारा काँग्रेसशी जुळणारी आहे. त्यामुळे "मी काँग्रेस विचारांचा असल्याने तुमच्याकडे (शिवसेनेत) येऊ शकत नाही," असे त्यांनी ठाकरेंच्या नेत्यांना आधीच कळवले होते.

पुणे महानगरपालिकेत नवी समीकरणे

प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पुण्यात महाविकास आघाडीची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याने नाराज झालेले कार्यकर्ते आता जगतापांच्या मागे उभे राहतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जगताप यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांची लढाई ही 'संविधान' आणि 'पुरोगामी' चळवळीसाठी असून, ते भाजपचा कडाडून विरोध करणाऱ्या पक्षासोबत (काँग्रेस) राहणे पसंत करत आहेत.

हेही वाचा: Devyani Farande : "कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय!"; पक्षप्रवेशावरून भाजप आमदार देवयानी फरांदे भावूक, गिरीश महाजनांनाही लगावला टोला

शेअर करा