मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Police recruitment Maharashtra : महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी! मंत्रिमंडळाचा 15 हजार पोलीस भरतीला हिरवा कंदील

Police recruitment Maharashtra : पालकमंत्रीपदावरून गोगावले नाराज?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Police recruitment Maharashtra : महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी! मंत्रिमंडळाचा 15 हजार पोलीस भरतीला हिरवा कंदील

Police recruitment Maharashtra : पालकमंत्रीपदावरून गोगावले नाराज? बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई :- महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत (दि. 12 ऑगस्ट 2025) पोलीस दलात तब्बल 15 हजार पदांच्या भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांची प्रतीक्षा यामुळे अखेर संपली आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. Police recruitment Maharashtra

या बैठकीत पोलीस भरतीव्यतिरिक्त आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

अन्न व नागरी पुरवठा विभाग: रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

विमानचालन विभाग: सोलापूर-पुणे-मुंबई या हवाई प्रवासासाठी 'Viability Gap Funding' निधी देण्यास मंजुरी.

सामाजिक न्याय विभाग: विविध कर्ज योजनांसाठी असलेल्या जामीनदाराच्या अटी शिथिल करून शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

गृह विभाग: 15,000 पोलीस भरतीला मंजुरी.

मंत्रिमंडळ बैठकीत 'नाराजीनाट्य'

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरमधून ऑनलाइन उपस्थित राहिले. मात्र, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले अनुपस्थित होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून त्यांची नाराजी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा मान राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना मिळाल्यामुळे गोगावले नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावत दिल्लीत कामासाठी गेल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

शेअर करा