मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Panvel Crime News : जबरी चोरीचा बनाव फसला – चालकाकडून ५.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पनवेल | खांदेश्वर पोलीस ठाणे khandeshvar Police Station हद्दीत घडलेल्या एका कथित जबरी चोरीच्या गुन्ह्याचा थरार अखेर उघड झाला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Panvel Crime News : जबरी चोरीचा बनाव फसला – चालकाकडून ५.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पनवेल | खांदेश्वर पोलीस ठाणे khandeshvar Police Station हद्दीत घडलेल्या एका कथित जबरी चोरीच्या गुन्ह्याचा थरार अखेर उघड झाला आहे. सोन्याच्या व्यापाऱ्याच्या विश्वासाला तडा देत, त्याचाच चालकाने बनाव रचल्याचे धक्कादायक वास्तव पोलिस तपासात समोर आले आहे. Panvel Latest Crime News

कसा घडला प्रकार?

सोन्याचे व्यापारी बी. बी. बांठिया ज्वेलर्स यांच्याकडून चालक शैलेश दिलीप कांबळे (३८, रा. घाटकोपर, मुंबई) याला १.५० लाख रुपये रोख आणि तब्बल ४.४० लाखांचे सोन्याचे दागिने (एकूण ५.९० लाख किंमतीचा मुद्देमाल) पनवेल मुख्य शाखेत नेण्यासाठी सोपविण्यात आले होते.

मात्र, खांदा कॉलनी रेल्वे ब्रिज येथे पोहोचल्यावर शैलेशने मालकाला सांगितले की – “दोन अज्ञात इसमांनी चाकूचा धाक दाखवून सर्व मुद्देमाल लुटून नेला.”

तपासात धक्कादायक उलगडा

गुन्हे शाखा कक्ष-३ पनवेलच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळी आरोपीने सांगितल्याप्रमाणे कोणतेही संशयित फिरताना दिसले नाहीत. चौकशी दरम्यान शैलेश कांबळे याची गोची झाली आणि शेवटी त्याने "जबरी चोरीचा बनाव रचल्याची" कबुली दिली. Panvel Police Latest News

त्याच्याकडून संपूर्ण मुद्देमाल – रोख रक्कम व सोन्याचे दागिने – पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या नेतृत्वात,
सपोनि पवन नांद्रे, पोउपनि अभयसिंह शिंदे, तसेच तपास पथकातील अनेक पोलिसांनी केली. Panvel Police Latest News

हेही वाचा: Panvel Robbery News : पनवेल हादरलं! जबरी चोरी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश – गुन्हे शाखा कक्ष ३ कडून धडक कारवाई

शेअर करा