मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांची विशेष मोहीम 'ऑपरेशन शोध' सुरू, हरवलेल्या मुलांना आणि महिलांना शोधणार

Navi Mumbai Police Search Operation : नवी मुंबई पोलिसांनी 'ऑपरेशन शोध' नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे, ज्याअंतर्गत पोलिस हरवलेल्या मुलांना आणि महिलांना शोधण्याचा प्रयत्न करतील.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Police : नवी मुंबई पोलिसांची विशेष मोहीम 'ऑपरेशन शोध' सुरू, हरवलेल्या मुलांना आणि महिलांना शोधणार

Navi Mumbai Police Search Operation : नवी मुंबई पोलिसांनी 'ऑपरेशन शोध' नावाची एक विशेष मोहीम सुरू केली आहे, ज्याअंतर्गत पोलिस हरवलेल्या मुलांना आणि महिलांना शोधण्याचा प्रयत्न करतील. ही मोहीम 17 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत चालेल.

नवी मुंबई :- मुंबई पोलिसांच्या शोध मोहिमा नंतर आता नवी मुंबई म्हणून पोलिसांनीही "ऑपरेशन शोध" ही मोहीम चालू केली आहे.जे 17 एप्रिल ते 30 मे पर्यंत चालेल. ज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, ही मोहीम 18 वर्षांखालील हरवलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलांना तसेच शहरातील 18 वर्षांवरील हरवलेल्या महिलांना शोधण्यासाठी आहे.

नवी मुंबई पोलिस प्रत्येक पोलिस स्टेशन पातळीवर शक्य तितक्या जास्त बेपत्ता मुले आणि महिलांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकत्र करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. या मोहिमेच्या यशासाठी नवी मुंबई पोलिसांनी नागरिक आणि बाल कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांकडून सहकार्य मागितले आहे. बालकल्याण समिती, कर्जत, अधीक्षक बाल निरीक्षण गृह रायगड, हे ही मोहिमेच्या अंतर्गत विशेष सहकार्य करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे तसेच पोलिसांनी नागरिकांना मदतीसाठी 103 या हेल्पलाईनवर संपर्क करण्यास सांगितले आहे.

शेअर करा