मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Police : वेश्याव्यवसायातून ९ महिलांची सुटका; ६ जण अटकेत

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेच्या Navi Mumbai Crime Branch अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने एपीएमसी परिसरातील दोन ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी अडकवून ठेवलेल्या ९ महिलांची सुटका केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Police : वेश्याव्यवसायातून ९ महिलांची सुटका; ६ जण अटकेत

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेच्या Navi Mumbai Crime Branch अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने एपीएमसी परिसरातील दोन ठिकाणी छापा टाकून वेश्याव्यवसायासाठी अडकवून ठेवलेल्या ९ महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे. Navi Mumbai Latest Crime News

Milind Bharambe, police commissioner,
Milind Bharambe, police commissioner,

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय येनपुरे, अपर आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे व उपआयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वपोनि पृथ्वीराज घोरपडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून "व्दारका रेसिडन्सी, सेक्टर-१९/सी, एपीएमसी, नवी मुंबई" येथे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याच्या संकेतावर पोलिसांनी छापा टाकून ४ महिलांची सुटका केली. यावेळी लॉज मॅनेजर मोहम्मद मुनातुल्ला शेख उर्फ बबलु, मॅनेजर मोहम्मद वकील शेख, रूम बॉय नजरूल आलम, तसेच रिक्षाचालक विकास भुनिया यांना अटक करण्यात आली.

त्यानंतर पिडीत महिलांच्या माहितीनुसार कोपरखैरणे सेक्टर-१२ मधील एका ठिकाणी दुसऱ्या छाप्यात आणखी ५ महिलांची सुटका झाली. येथून रूम मॅनेजर जहागिर मोल्ला आणि रिक्षाचालक सिताराम यादव यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुख्य आरोपी सुधाकर पालन, अब्दुल तरफदार आणि राजू बंगाली हे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमे तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींना न्यायालयाने २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

शेअर करा