मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : नवी मुंबईत देहविक्रय अड्ड्यावर छापा; एका अल्पवयीन मुलीसह सात जणींची सुटका

Navi Mumbai Sex Racket Busted News : तळोजा एमआयडीसीतील हॉटेल 'नवनाथ इन'वर गुन्हे शाखेची कारवाई; मालकासह तिघांना अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : नवी मुंबईत देहविक्रय अड्ड्यावर छापा; एका अल्पवयीन मुलीसह सात जणींची सुटका

Navi Mumbai Sex Racket Busted News : तळोजा एमआयडीसीतील हॉटेल 'नवनाथ इन'वर गुन्हे शाखेची कारवाई; मालकासह तिघांना अटक

नवी मुंबई | नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयाच्या हद्दीत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) रविवारी मोठी कारवाई केली. तळोजा एमआयडीसी परिसरातील 'हॉटेल नवनाथ इन' या लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करत पोलिसांनी एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह सहा पिडीत महिलांची सुटका केली आहे. याप्रकरणी लॉज मालक, मॅनेजर आणि वेटरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Navi Mumbai Sex Racket Busted News

बनावट ग्राहकाद्वारे सापळा

तळोजा एमआयडीसी येथील हॉटेल नवनाथ इनचा मॅनेजर ग्राहकांकडून पैसे घेऊन महिलांना देहविक्रयासाठी उपलब्ध करून देत असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले. वेटरने या ग्राहकाकडून 2000 रुपये स्वीकारून पसंतीची महिला निवडण्यास सांगताच, इशारा मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने हॉटेलवर छापा टाकला.

अल्पवयीन मुलीसह बांगलादेशी महिलांची सुटका

या कारवाईत पोलिसांनी एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीची आणि सहा महिलांची सुटका केली. विशेष म्हणजे, या सहा महिलांपैकी दोन महिला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी या पीडित मुलींना आणि महिलांना आर्थिक आमिष दाखवून आणि प्राप्त करून घेऊन त्यांना लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी डांबून ठेवले होते.

मालकासह तिघांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा

याप्रकरणी पोलिसांनी लॉज मालक वसंत गणेश शेट्टी, मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी आणि सर्व्हिस बॉय रोशन रामजित यादव या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथकाची कामगिरी

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस हवालदार मांडोळे, सविता म्हात्रे, मनीषा पावडे आणि पोलीस शिपाई ठाकूर, चव्हाण, पारासुर, कोलते व हाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शेअर करा