मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai News : दारूमुक्त खारघरसाठी निर्धार

पनवेल जितिन शेट्टी : खारघर शहर दारूमुक्त व्हावे, No Alcohol City Kharghar यासाठी सहयोग सेवाभावी संस्था आणि खारघरमधील नागरिकांच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात आले आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai News : दारूमुक्त खारघरसाठी निर्धार

पनवेल जितिन शेट्टी : खारघर शहर दारूमुक्त व्हावे, No Alcohol City Kharghar यासाठी सहयोग सेवाभावी संस्था आणि खारघरमधील नागरिकांच्या वतीने जनआंदोलन उभारण्यात आले आहे. या आंदोलनाच्या अंतर्गत रविवारी खारघरमध्ये सांकेतिक उपोषण करण्यात आले. या उपोषणाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधला आणि दारूमुक्त खारघरसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला.


राज्य शासनाने खारघर शहर दारूमुक्त घोषित करावे, यासाठी संघर्ष समिती गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहे. २००७ पासून मोर्चे, आंदोलने आणि शासनाकडे पत्रव्यवहार समितीने केले आहेत. याच मागणीसाठी १८ मे रोजी खारघरमधील शिल्प चौकात एकदिवसीय सांकेतिक उपोषण आयोजित करण्यात आले होते, ज्याला खारघरवासियांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खारघर शहराला दारूमुक्त करण्याची मागणी येथील नागरिक मागील दोन दशकांपासून करत आहेत. मात्र, उत्पादन शुल्क विभाग लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून दारू विक्रीचे परवाने वाटप करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अभिमन्यू पाटील, ऍड. नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे, वासुदेव पाटील, समीर कदम, युवा मोर्चा अध्यक्ष नितेश पाटील, अमर उपाध्याय, यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा