मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनात 'दिबां'चे नाव गायब; भूमिपुत्रांचा संताप शिगेला

Suresh Mahtre On Navi Mumbai Airport : खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा 3 डिसेंबरला लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचा इशारा

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनात 'दिबां'चे नाव गायब; भूमिपुत्रांचा संताप शिगेला

Suresh Mahtre On Navi Mumbai Airport : खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा 3 डिसेंबरला लाखोंच्या संख्येने मोर्चा काढण्याचा इशारा

नवी मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडले असले, तरी विमानतळाला माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबत साधा उल्लेखही न केल्याने रायगड, ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संतापाच्या पार्श्वभूमीवर भिवंडीचे खासदार सुरेश Suresh Mhatre म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी तातडीने भूमिपुत्रांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली आहे.

पांच वर्षांपासूनची मागणी; आश्वासनानंतरही उपेक्षा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी गेल्या 2021 पासून सातत्याने होत आहे. यासाठी दि. बा. पाटील सर्वपक्षीय नामकरण समितीने अनेक मोर्चे आणि आंदोलने केली आहेत.

यापूर्वी, नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाने 30 सप्टेंबर रोजी अचानकपणे विमानतळाचा परवाना 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' या नावाने जारी केला होता. त्यानंतर भूमिपुत्रांनी आंदोलनाचा इशारा दिला. 6 ऑक्टोबर रोजी नियोजित असलेला 'लाँग मार्च' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आला होता, त्याऐवजी कार रॅली काढण्यात आली होती.

उद्घाटनानंतर संतापाचा उद्रेक

8 ऑक्टोबर रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही दि. बा. पाटील यांच्या नावाचा साधा उल्लेखही न केल्यामुळे भूमिपुत्रांची फसगत झाल्याची भावना तीव्र झाली आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुरेश म्हात्रे यांनी भूमिपुत्रांची बैठक घेतली.

3 डिसेंबरला निर्णायक आंदोलन

या बैठकीनंतर खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी मोठी घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याने 60 दिवस आंदोलन केले जाणार नाही. मात्र, या 60 दिवसांच्या आत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले गेले नाही, तर 3 डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने भूमिपुत्र आंदोलन करतील. या इशाऱ्यामुळे विमानतळ नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.

शेअर करा