मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Navi Mumbai ACB Trap : 'नैना'च्या भ्रष्टाचारावर एसीबीचा सर्जिकल स्ट्राईक! - 6 लाखांची लाच स्वीकारताना उपअधीक्षकासह निमतानदार जाळ्यात

Navi Mumbai ACB Latest Trap News : भूखंड मोजणीच्या 'क' पत्रासाठी मागितली होती 9 लाखांची खंडणी; सीबीडी बेलापूरमध्ये रंगला अटकेचा थरार; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

V
Vivek

1 मिनिट वाचन

Navi Mumbai ACB Trap : 'नैना'च्या भ्रष्टाचारावर एसीबीचा सर्जिकल स्ट्राईक! - 6 लाखांची लाच स्वीकारताना उपअधीक्षकासह निमतानदार जाळ्यात

Navi Mumbai ACB Latest Trap News : भूखंड मोजणीच्या 'क' पत्रासाठी मागितली होती 9 लाखांची खंडणी; सीबीडी बेलापूरमध्ये रंगला अटकेचा थरार; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

नवी मुंबई :- नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इन्फ्लुएन्स एरिया अर्थात 'नैना' (NAINA) प्रकल्पातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. भूखंड मोजणीचा अहवाल देण्यासाठी 6 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नैना भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक दिलीप तुळशीदास बागुले आणि निमतानदार कलिमुद्दीन रियाजुद्दीन शेख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. Navi Mumbai Latest ACB Trap News

नेमका काय आहे प्रकार?

एका नामांकित विकासकासाठी काम करणाऱ्या तक्रारदाराने 'नैना' क्षेत्रातील टीटीएस क्रमांक 1 मधील भूखंड क्रमांक 27 च्या मोजणीसाठी अर्ज केला होता. 3 डिसेंबर रोजी या भूखंडाची मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, या मोजणीचा अधिकृत रिपोर्ट आणि 'क' पत्र देण्यासाठी निमतानदार कलिमुद्दीन शेख याने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. या व्यवहारासाठी त्याने भूमी अभिलेखचे उपअधीक्षक दिलीप बागुले यांच्याशी तक्रारदाराचा संपर्क करून दिला.

तडजोड 9 लाखांची, अटक 6 लाखांवर

सुरुवातीला बागुले यांनी या कामासाठी 9 लाख रुपयांची अवाढव्य मागणी केली होती. मात्र, बऱ्याच वाटाघाटींनंतर हा व्यवहार 6 लाख रुपयांवर निश्चित झाला. तक्रारदाराने या भ्रष्टाचाराची माहिती तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.

गाडीत पैसे स्वीकारताना पडल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीडी बेलापूर परिसरात सापळा रचण्यात आला होता. कलिमुद्दीन शेख याने तक्रारदाराच्या गाडीत बसून 6 लाख रुपयांची रोख रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला झडप घालून पकडले. या कारवाईनंतर मुख्य सूत्रधार दिलीप बागुले (वय 55, रा. बदलापूर) आणि कलिमुद्दीन शेख (वय 27, रा. कामोठे) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या मोठ्या रक्कमेच्या लाच प्रकरणामुळे 'नैना' कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

शेअर करा