मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nashik News : नाशिकमध्ये भाजपची 'मेगाभरती': ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का!

•रविवारी जम्बो पक्षप्रवेश सोहळा; सुनील बागुल, मामा राजवाडे यांच्यासह अनेकजण भाजपमध्ये

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nashik News : नाशिकमध्ये भाजपची 'मेगाभरती': ठाकरे गट आणि काँग्रेसला धक्का!

•रविवारी जम्बो पक्षप्रवेश सोहळा; सुनील बागुल, मामा राजवाडे यांच्यासह अनेकजण भाजपमध्ये

नाशिक: आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने नाशिकमध्ये जोरदार 'इनकमिंग' सुरू केले आहे. येत्या रविवारी (28 जुलै) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये एका भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसला मोठे धक्के बसणार असून, अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (ठाकरे गट) चे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबतच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारीही भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर, येत्या काळात भाजपमध्ये अनेक मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे. रविवारी होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी या पक्षप्रवेशांबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, "रविवारी रावसाहेब थोरात सभागृहात सुनील बागुल, मामा राजवाडे, गुलाब भोये यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल. राहुल दिवे यांचाही प्रवेश होण्याची शक्यता आहे. अजूनही ठाकरे गट आणि काँग्रेसचे अनेक नेते व पदाधिकारी आमच्या संपर्कात असून, लवकरच तेही भाजपमध्ये येतील." पक्षप्रवेश नाशिकमध्येच का होत आहेत, या प्रश्नावर केदार म्हणाले, "प्रवेश स्थानिक पातळीवरच व्हावेत, अशी आमची आणि प्रवेश करू इच्छिणाऱ्यांचीही इच्छा होती. त्यामुळे आगामी काळातही नाशिकमध्येच मोठे पक्षप्रवेश होतील."

नाशिक महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिलेला '100 प्लस'चा नारा फोल ठरेल, अशी टीका काँग्रेसने केली आहे. यावर सुनील केदार यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिले. "काँग्रेसचा हा भ्रमनिरास आहे. देशात, राज्यात आणि शहरात काँग्रेसचे अस्तित्वच उरलेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून अशी वैफल्यग्रस्त वक्तव्ये होत आहेत," असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर निशाणा साधला.

हेही वाचा: Raigad Rain Update : रायगडमध्ये पावसाचा हाहाकार: खोपोलीत पूरसदृश स्थिती, कुंडलिका नदी इशारा पातळीवर!

शेअर करा