Nashik Crime : नाशिकमध्ये ९८ ग्रॅम एमडीसदृश अमली पदार्थ जप्त; तिघांना अटक
Nashik crime नाशिक, महाराष्ट्र मिरर: गंगापूर रोड परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांची चौकशी केल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या (ANTF) नाशिक कृती विभागाने एमडी (मेफेड्रॉन) सदृश अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली.
2 मिनिट वाचन

Nashik Crime : अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची गंगापूर रोडवर कारवाई; दुचाकी, दोन मोबाईलसह ३.३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Nashik crime नाशिक, महाराष्ट्र मिरर: गंगापूर रोड परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांची चौकशी केल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या (ANTF) नाशिक कृती विभागाने एमडी (मेफेड्रॉन) सदृश अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक केली. आरोपींकडून ९८.५६० ग्रॅम एमडीसदृश अमली पदार्थासह मोपेड, दोन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण ३ लाख ३५ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ nashik crime
अनिकेत बाळू गांगुर्डे (वय २५, रा. राजवाडा, गंगापूर गाव, नाशिक), सागर काशिनाथ गांगुडे (वय ३२, रा. सावंत रो हाऊस, शिवाजीनगर, कार्बन नाका, नाशिक) आणि राहुल प्रल्हाद खंडारे (वय २६, रा. यशराज अपार्टमेंट, ध्रुवनगर, नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.https://maharashtramirror.com/ nashik crime
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक कृती विभागाचे पथक ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास गंगापूर रोड परिसरात गस्त घालत होते. गोवर्धन गाव ते कानेटकर गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटच्या खांबासमोर दोन जण पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हावर संशयास्पदरीत्या हालचाल करताना पथकाला आढळून आले.https://maharashtramirror.com/ nashik crime
त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पथकाने दोघांकडे चौकशी केली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात अमली पदार्थाशी संबंधित मुद्देमाल मिळून आल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. या कारवाईच्या पुढील तपासात आणखी एका आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याचे प्रेसनोटमधील माहितीतून स्पष्ट होते. त्यानुसार पोलिसांनी तिघांना अटक केली.
९८.५६० ग्रॅम एमडीसदृश पदार्थ
आरोपींच्या ताब्यातून पांढऱ्या रंगाचा चकाकणारा ९८.५६० ग्रॅम एमडी (मेफेड्रॉन) सदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या पदार्थाची किंमत प्रतिग्रॅम तीन हजार रुपये याप्रमाणे २ लाख ९५ हजार ६८० रुपये असल्याचे टास्क फोर्सने नमूद केले आहे.
याशिवाय गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली एमएच १५ जीएम ०२७७ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ॲक्टिव्हा मोपेड जप्त करण्यात आली. तिची किंमत २० हजार रुपये आहे. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीचे वनप्लस आणि ओप्पो कंपनीचे दोन मोबाईल तसेच २०० रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा जप्त करण्यात आला. अमली पदार्थासह जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत ३ लाख ३५ हजार ८८० रुपये असल्याची माहिती टास्क फोर्सने दिली.
गंगापूर रोड पोलिस ठाण्यात गुन्हा
याप्रकरणी गंगापूर रोड पोलिस ठाण्यात १० सप्टेंबर रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८३/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायदा १९८५च्या कलम ८(क), २२(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेला एमडीसदृश अमली पदार्थ आरोपींनी नेमका कोठून आणला होता, तो कोणाला विक्री किंवा पुरवठा केला जाणार होता तसेच या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेण्यावर तपास यंत्रणेने भर दिला आहे. या गुन्ह्याचे पुढील आणि मागील धागेदोरे (फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज) शोधण्यासाठी ANTFच्या नाशिक कृती विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक तसेच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक कृती विभागातील अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने केली.
दरम्यान, अमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवनासंदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि संपर्क क्रमांक पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल, असेही टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे.




