मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nandu Naik Club Pune | पुणे : कुख्यात नंदू नाईकच्या अवैध क्लबवर गुन्हे शाखेची धडक कारवाई, ६० जण ताब्यात

अवैध धंदे बंद करण्याचे पुणे पोलिसांसमोर आव्हान

M
mubarak

1 मिनिट वाचन

nandu naik club pune

  • अवैध धंदे बंद करण्याचे पुणे पोलिसांसमोर आव्हान
  • पुणे, दि. २६ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Nandu Naik Club Pune |

    पुण्यातील कुख्यात नंदू नाईकच्या अवैध धंद्यावर पुणे शहर गुन्हे शाखेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. रात्री झालेल्या ऑपेरेशन मध्ये तब्बल ६० जुगारी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. पुणे शहरात अवैध धंदे बंद असताना नंदू नाईक कोणत्या 'वसुलीवाल्याच्या' आशीर्वादाने निर्ढावला होता याची खमंग चर्चा पोलीस आयुक्तलयात रंगली आहे. Nandu Naik Club Pune |

    पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार CP Amitesh Kumar यांनी अवैध धंदे कडेकोट बंद ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कडक सूचना दिल्या होत्या.

    काल रात्री उशिरा गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गणेश इंगळे, सहा. पो. आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने खडक हद्दीतील जनसेवा भोजनालय, पाहिला मजला, शुक्रवार पेठ पेठेतील चर्चित नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर कारवाई करून तब्बल ६० जणांना ताब्यात घेतले.

    सदर कारवाई मध्ये रक्कम 1,00,250/-रोख व 47 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपीसह एकूण 60 इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    यापूर्वी नंदू नाईक विरोधात मोक्का कारवाई झाली आहे.

    सदरची कारवाई Pune Police पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, सहा.पो. आयुक्त गुन्हे 1 गणेश इंगळे, सहा. पो. आयुक्त गुन्हे 2 राजेंद्र मुळीक मार्गदर्शनाखाली अमली विरोधी पथक १ व २, खंडणी विरोधी पथक १, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक 1, युनिट 1 व 5 यांनी सदरची कारवाई केली आहे. Nandu Naik Club Pune

    हेही वाचा: Pune Crime News : "पुण्यात सोन्याचा ट्रक"….तब्बल 138 कोटींचे सोने जप्त, सहकारनगर भागात पोलिसांची कारवाई

    शेअर करा