मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

नांदेड : 'आरटीओ’ मध्ये आठ हजारांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला अटक

Nanded Eight Thousand Bribe News : वाहन (टेम्पो) फिटनेस परवाना काढण्यासाठी एजंटला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे

V
Vivek

1 मिनिट वाचन

नांदेड : 'आरटीओ’ मध्ये आठ हजारांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला अटक

Nanded Eight Thousand Bribe News : वाहन (टेम्पो) फिटनेस परवाना काढण्यासाठी एजंटला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे

नांदेड :- आरटीओ कार्यालयात वाहन फिटनेस काढण्यासाठी गेलेल्या टेम्पो चालकाकडून आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी एजंटला रंगेहाथ पकडले. Nanded 8 Thousand Bribe Case RTO छत्रपती संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या बीड युनिट कारवाई Beed ACB Unit केली आहे. अब्दुल रहीम अब्दुल मजीद (खाजगी व्यक्ती) असे आरटीओ एजंट चे नाव आहे. आरटीओ अधिकाऱ्याचे नाव सांगून दहा हजार रुपयांची लाच मागितली होती. Nanded ACB Trap News

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,यातील तक्रारदार हे चालक असुन त्यांचा टेम्पो आहे.वाहनाची तपासणी होऊन फिटनेस प्रमाणपत्र मिळणे करिता ऑनलाइन अर्ज केला होता. वाहनची तपासणी करून देऊन फिटनेस प्रमाणपत्र मिळून देण्यासाठी यातील खाजगी एजंट याने स्वतः करिता व आरटीओ रंजित पाटील यांचे नावाने असे एकूण 10 हजार रुपयांची लाच मागणी करून आठ हजार स्वीकारण्याचे मान्य केले आहे.तक्रारदार यांनी 18 फेब्रुवारी 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड पथकास येथे लिखित तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने दि. 20 फेब्रुवारी रोजी बीड येथे RTO कार्यालयात पडताळणी केली असता,आरोपीताने पंचांसमक्ष स्वतः करिता व रंजित पाटील यांचे नावाने 10 हजार असे लाचेची मागणी करून आठ हजार रु लाच स्वीकारण्याचे मान्य केले. तक्रारदार यांचेकडून आठ हजार रुपये बशीर गंज चौक येथे स्वतः पंच समक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.

acb sp sandeep aatole

एसीबी पथक

संदीप आटोळे,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजी नगर,परिक्षेत्र छत्रपती संभाजी नगर मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र छत्रपती संभाजी नगर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी शंकर शिंदे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. बीड सापळा अधिकारी - पोलीस निरीक्षक युनूस शेख सापळा पथक:- पोलीस अंमलदार - सुरेश सांगळे श्रीराम गिरम, भरत गारदे, अविनाश गवळी संतोष राठोड, अमोल खरसाडे,अंबादास पुरी यांनी कारवाई केली आहे.

शेअर करा