मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nalasopra MD Drugs News : नालासोपाऱ्यात ‘एमडी’चा धडाका! पेल्हार पोलिसांचे कान टोचले; वनकोटींना निलंबनाचा दणका!

Mira Bhayandar Police On MD Racket : मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तांचा थेट दणका; "पोलिसच झोपले तर नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?"

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nalasopra MD Drugs News : नालासोपाऱ्यात ‘एमडी’चा धडाका! पेल्हार पोलिसांचे कान टोचले; वनकोटींना निलंबनाचा दणका!

Mira Bhayandar Police On MD Racket : मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तांचा थेट दणका; "पोलिसच झोपले तर नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?"

नालासोपारा :- नालासोपारा परिसरात छुप्या पद्धतीने सुरू असलेला कोट्यवधी रुपयांच्या मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्जचा कारखाना उघडकीस आल्यानंतर, या प्रकरणाची गंभीर दखल घेत मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने मोठी कारवाई केली आहे. या भागातील पेल्हार पोलीस ठाण्याचे Pelhar Police Senior PI Suspended वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना आयुक्त निकेत कौशिक यांनी तडकाफडकी निलंबित करण्याचा दणका दिला आहे. Nalasopra Crime News

पोलीस दलात खळबळ

मुंबई पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून हा अमली पदार्थांचा डोंगर उघडकीस आणला होता. पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतच, जवळच्या अंतरावर हा कारखाना अनेक महिन्यांपासून फुलत असताना स्थानिक पोलिसांना याची खबर नसणे, हे प्रशासकीय अपयश मानले जात आहे.

या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली असून, "एमडीचा धंदा कोणाच्या छत्रछायेखाली फुलला होता?" असा सवाल शहरात गाजू लागला आहे.

कारखान्यातून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांसह, रसायनं आणि उपकरणे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या अड्ड्यामागे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या रकमेचा खेळ लपलेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नागरिकांकडून संताप व्यक्त

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "गुन्हेगार पकडले गेले, पण पोलिसच जर झोपले असतील, तर नागरिकांनी कुणावर विश्वास ठेवायचा?" अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, वनकोटींवरील निलंबनानंतर पेल्हार पोलीस ठाण्यात सध्या शांतता पसरली असून, काही अधिकारी आता 'एमडी'च्या उर्वरित प्रकरणांचा तपास आणि पाठपुरावा करण्यात गुंतले असल्याचे बोलले जात आहे.

शेअर करा