मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Nagpur Winter Session : भरसभागृहात 'जादू की झप्पी'! - नितेश राणेंच्या 'टोला' मारताच आदित्य ठाकरेंकडून भास्कर जाधवांना मिठी, विधानसभेत हशा पिकला

Nagpur Winter Session : मच्छीमार बोर्डावरून कोकणी नेत्यांची शाब्दिक जुगलबंदी; राणेंच्या मिश्किल विधानानंतर सभागृहातील वातावरण झाले हलकेफुलके

V
Vivek

1 मिनिट वाचन

Nagpur Winter Session : भरसभागृहात 'जादू की झप्पी'! - नितेश राणेंच्या 'टोला' मारताच आदित्य ठाकरेंकडून भास्कर जाधवांना मिठी, विधानसभेत हशा पिकला

Nagpur Winter Session : मच्छीमार बोर्डावरून कोकणी नेत्यांची शाब्दिक जुगलबंदी; राणेंच्या मिश्किल विधानानंतर सभागृहातील वातावरण झाले हलकेफुलके

नागपूर :- राज्याच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra Winter Session) आज सभागृहात अनेकदा एकमेकांवर टीका करणाऱ्या कोकणातील दोन नेते—मंत्री नितेश राणे Nitesh Rane आणि आमदार भास्कर जाधव—यांच्यातील मिश्किल जुगलबंदीने सर्वांचे लक्ष वेधले. याच जुगलबंदीचा परिणाम म्हणून आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी भरसभागृहात भास्कर जाधव यांना मिठी मारल्याची घटना घडली.
मच्छिमारांच्या प्रश्नावर चर्चा करताना भास्कर जाधव यांनी मंत्री नितेश राणे यांना मच्छीमार बोर्डाचे पुनरुज्जीवन करण्याची सूचना केली आणि गरज पडल्यास आपण मदत करू, असे सांगितले.

यावर उत्तर देताना नितेश राणे यांनी भास्कर जाधवांचे कौतुक केले, पण लगेचच आदित्य ठाकरे यांना कोपरखळी मारली. "भास्कर जाधव हे ज्येष्ठ सदस्य आहेत, त्यांच्या सूचना चांगल्या असतात. त्यांना वाटतं मी ऐकत नाही, पण त्यांचाही टोन आदित्य ठाकरे बाजूला असल्यावर वेगळा असतो आणि नसले तर वेगळा असतो," असे ते म्हणाले. राणे पुढे म्हणाले की, 'वैयक्तिक भेटल्यावर ते (जाधव) मिठीही मारतात'.

राणे यांनी मिठी मारण्याचा उल्लेख करताच, भास्कर जाधवांच्या शेजारी बसलेल्या आदित्य ठाकरे यांनी तात्काळ उभे राहून भास्कर जाधव यांना प्रेमाने मिठी मारली, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. नितेश राणे यांनीही हसून दाद दिली. राणे यांनी जाधव यांची सूचना मान्य करत म्हटले की, "मी आपल्यासमोरच ही मिटींग लावेल, कारण आपल्या अनुभवाचा फायदा आम्हाला, कोकणाला आणि मच्छिमारांनाही पाहिजे."

शेअर करा