मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Underworld Don : “छोटा राजनचा हात अजूनही मुंबईत लांब!”

Mumbai Crime Branch : त्याचा खास शिलेदार डी.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Underworld Don : “छोटा राजनचा हात अजूनही मुंबईत लांब!”

Mumbai Crime Branch : त्याचा खास शिलेदार डी. के. राव १.५ कोटींच्या खंडणी प्रकरणात अटक — गुन्हे शाखेची सत्र न्यायालयाबाहेर थरारक कारवाई!

मुंबई प्रतिनिधी:विवेक राजेंद्र जगताप
मुंबई गुन्हे शाखेने Mumbai Crime Branch छोटा राजन टोळीवर Mumbai Underworld Don Choota Rajan मोठा हातोडा मारत त्याचा विश्वासू लेफ्टनंट समजला जाणारा डी. के. राव याला शुक्रवारी थेट सत्र न्यायालयाच्या आवारात अटक केली आहे. Mumbai Crime Branch Latest News
त्याच्यासोबत दोन साथीदार — अनिल सिंग आणि मिमित घुटा — यांनाही जेरबंद करण्यात आले असून,
१.५ कोटींच्या खंडणी प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

सत्र न्यायालयाबाहेरच सापळा — डी. के. राव ‘थेट ताब्यात’!

डी. के. राव कोर्टातील सुनावणीसाठी आला असताना,
गुन्हे शाखेच्या पथकाने धोबीपछाड कारवाई करून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्या अटकेने राजन टोळीच्या हालचालींबाबत पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

खंडणीचा खेळ : बिल्डरकडून न परतवलेले १.५ कोटी रुपये आणि धमक्या!

तक्रारदाराने एका बिल्डरला १.५ कोटी रुपये गुंतवणुकीसाठी दिले होते,
मात्र बिल्डरने ती रक्कम परत केली नाही.
उलट बिल्डरनेच तक्रारदाराला दाबण्यासाठी डी. के. रावचा हात धरला.
यानंतर रावने “राजन टोळीच्या नावावरून” धमक्या देत
तक्रारदाराकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला.

तक्रारदाराने दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने गुप्त तपास राबवून राव आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना शुक्रवारी अटक केली.

गुन्हे शाखेचा चोख डाव

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुनियोजित सापळा रचून
रावला न्यायालय परिसरातूनच पकडले.
त्याला आणि त्याच्या दोन्ही साथीदारांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या कारवाईमुळे छोटा राजन गँगच्या उरलेल्या नेटवर्कवर आता आणखी आवळा येणार,
असे पोलिस सूत्रांकडून समजते.

महत्त्वाची पार्श्वभूमी

डी. के. राव हा गेल्या अनेक दशकांपासून छोटा राजन टोळीशी जोडलेला असून,
त्याच्यावर खंडणी, मारहाण, खून, जमीन व्यवहारातील दबाव अशा अनेक गुन्ह्यांचे ढीग आहेत.
तुरुंगात असतानाही त्याच्या नावावरून
मुंबईत गुन्हेगारीच्या हालचाली सुरू असल्याच्या
अनेक तक्रारी पोलिसांकडे येत होत्या.

गुन्हे शाखेचे पथक

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखा उपायुक्त नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पथक प्रमुख पो.नि. (गुन्हे) संदीप घोडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

शेअर करा