मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police : कुणाल कामराला धक्का, मुंबई पोलिसांनी कॉमेडियनची मागणी फेटाळली

Mumbai Police On Kunal Kamra : एकनाथ शिंदे यांच्यावर‌ अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी कुणाल कामराविरुद्ध महाराष्ट्रात आतापर्यंत तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police : कुणाल कामराला धक्का, मुंबई पोलिसांनी कॉमेडियनची मागणी फेटाळली

Mumbai Police On Kunal Kamra : एकनाथ शिंदे यांच्यावर‌ अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी कुणाल कामराविरुद्ध महाराष्ट्रात आतापर्यंत तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, त्याला मुंबई पोलिसांकडून जोरदार धक्का बसला आहे.

मुंबई :- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला Kunal Kamra मोठा धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांच्या खार पोलिसांनी Khar Police कुणाल कामराला समन्स बजावले होते, ज्यावर कुणाल कामराने एका आठवड्याची मुदत मागितली होती, मात्र मुंबई पोलिसांनी त्याची मागणी फेटाळून लावली.

कुणाल कामरा यांच्या वकिलाने बुधवारी (26 मार्च) खार पोलीस स्टेशन गाठले आणि कुणालच्या जबाबाची हार्ड कॉपी आणि अपील खार पोलिसांना एका आठवड्याची मुदत मागितली. यानंतर खार पोलिसांनी कुणाल कामरा यांची एका आठवड्याच्या मुदतीची मागणी फेटाळून लावली. आता आजच खार पोलीस कुणाल कामराला बीएनएस कलम 35 अंतर्गत दुसरे समन्स बजावणार आहेत.

आत्तापर्यंत महाराष्ट्रात कुणाल कामराविरोधात तीन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. प्रथम, मुंबई पोलीस एफआयआर हस्तांतरित करून खार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला, दुसरा एफआयआर डोंबिवली येथे नोंदवून खार पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला.मनमाड, नाशिक येथे एफआयआर नोंदवून खार पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे.

शेअर करा