मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Police : दिवाळीपूर्वी पूर्व प्रादेशिक विभागाकडून 800 मोबाईल परत!

Mumbai Police Return 800 Stolen Mobile : परिमंडळ-6 मधील चोरीस गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना वितरित

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Police : दिवाळीपूर्वी पूर्व प्रादेशिक विभागाकडून 800 मोबाईल परत!

Mumbai Police Return 800 Stolen Mobile : परिमंडळ-6 मधील चोरीस गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना वितरित

मुंबई :- बृहन्मुंबई पोलीस दलाच्या 'चोरीस गेलेला मुद्देमाल परत' करण्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत पूर्व प्रादेशिक विभागाने आज, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी मोठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. परिमंडळ-6 मधील पोलीस Unit 6 Mumbai ठाण्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला लाखो रुपयांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. Mumbai Latest Robbery News

या मोहिमेचा मुख्य भाग म्हणून, गोवंडी येथील ग्रँड बॅन्क्वेट हॉल, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत "भव्य समारंभाचे" आयोजन करण्यात आले होते. या समारंभात सुमारे 800 मोबाईल फोन आणि इतर हस्तगत केलेला मुद्देमाल मूळ मालकांना वितरीत करण्यात आला. Mumbai Latest Crime News

अपर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कामगिरी पार पडली. यावेळी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-6, समीर शेख, परिमंडळ-6 मधील सर्व विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सायबर अधिकारी उपस्थित होते. Mumbai Latest Crime News

चोरीला गेलेले मोबाईल फोन आणि इतर मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिलेल्या या 'भेट'बद्दल नागरिकांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

शेअर करा