मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मुंबई महापालिकेत शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक'! अभ्यासू अमेय घोलेंकडे शिवसेनेचे सारथ्य; सत्तेच्या गणितासाठी महायुतीची 'कोकण भवन'मध्ये मोठी खेळी

Mumbai BMC News : देवेंद्र फडणवीसांचा 'मास्टरस्ट्रोक'; स्थायी समितीवरील वर्चस्वासाठी भाजप आणि शिवसेनेची रणनीती यशस्वी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai News : मुंबई महापालिकेत शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक'! अभ्यासू अमेय घोलेंकडे शिवसेनेचे सारथ्य; सत्तेच्या गणितासाठी महायुतीची 'कोकण भवन'मध्ये मोठी खेळी

Mumbai BMC News : देवेंद्र फडणवीसांचा 'मास्टरस्ट्रोक'; स्थायी समितीवरील वर्चस्वासाठी भाजप आणि शिवसेनेची रणनीती यशस्वी

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या Mumbai BMC महापौरपदाचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या सत्तेत आपली पकड मजबूत करण्यासाठी अत्यंत अनुभवी आणि 'युवा' चेहरा मैदानात उतरवला आहे. शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचे नेतृत्व करण्यासाठी अभ्यासू नगरसेवक अमेय घोले यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली असून, महायुतीने आज मुंबईच्या तिजोरीची चावी मानल्या जाणाऱ्या 'स्थायी समिती'वर ताबा मिळवण्यासाठी 'मॅथेमॅटिकल' फिल्डिंग लावली आहे. Mumbai Political News

शिवसेनेतील एक अत्यंत संयमी आणि प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असलेला चेहरा अशी अमेय घोले यांची ओळख आहे. सलग तीन टर्म नगरसेवक राहिलेल्या घोलेंकडे गटनेतेपद सोपवून शिंदेंनी मुंबईत आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आज सकाळी 10 वाजता मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा मेळा जमला आणि तेथून हे सर्वजण एकत्रितपणे 'कोकण भवन'कडे गटनोंदणीसाठी रवाना झाले.

देवेंद्र फडणवीसांची 'पॉवर प्ले' आणि ठाकरे गटाची कोंडी

या संपूर्ण प्रक्रियेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावलेली फिल्डिंग महत्त्वाची ठरली आहे. ठाकरे गटाच्या 65 नगरसेवकांना रोखण्यासाठी महायुतीने स्वतःची ताकद दोन गटांत विभागली आहे. भाजपने आपले 89 नगरसेवक स्वतंत्र नोंदवले आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या 29 नगरसेवकांची एकत्र गटनोंदणी केली आहे. या तांत्रिक खेळीमुळे महायुतीचा स्थायी समितीतील आकडा एकाने वाढणार असून, कोणत्याही महत्त्वाच्या प्रस्तावावर विरोधकांची कोंडी करणे सत्ताधाऱ्यांना सोपे होणार आहे.

शेअर करा