मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : मुंबईत शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला इंजेक्शन देऊन फरार, रुग्णालयात दाखल

Mumbai News : भांडुपमध्ये अज्ञात व्यक्तीने 9 वर्षीय शाळकरी मुलीला इंजेक्शन देऊन पळ काढला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai News : In Mumbai, a minor girl on her way home from school absconded after giving an injection, admitted to hospital

Mumbai News : भांडुपमध्ये अज्ञात व्यक्तीने 9 वर्षीय शाळकरी मुलीला इंजेक्शन देऊन पळ काढला. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई :- भांडुपमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून, 9 वर्षांची शाळकरी मुलगी शाळेतून घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने मुलगी एकटी दिसल्याने तिला इंजेक्शन देऊन तेथून पळ काढला. मुलगी भांडुपमधील एका नियुक्त शाळेत शिकते आणि 31 जानेवारीला ती शाळेच्या मैदानात खेळण्यासाठी गेली होती.

या घटनेबाबत मुलीने तिच्या पालकांना सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने तिला शाळेच्या आवारात एका निर्जनस्थळी नेले आणि घटनेचे गांभीर्य पाहून पालकांनी मुलीला तातडीने उपचारासाठी नेले वर जाऊन भांडुप पोलिसात तक्रार केली.या प्रकरणाच्या तपासासाठी भांडुप पोलिसांनी 4 पथके नेमली असून, शाळेच्या आवारात लावलेले सीसीटीव्ही तपासण्यात आले. पोलिसांना अद्याप असा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही.

मुलीच्या रक्त तपासणी, क्ष-किरण व इतर तपासण्या करण्यात आल्या असून सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. सीसीटीव्हीमध्येही ही मुलगी शाळेच्या मैदानात खेळताना दिसत आहे आणि त्यानंतर ती तिच्या वर्गात मैत्रिणींसोबत खेळताना दिसत आहे.

दरम्यान, मुलीला उपचारासाठी वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून मुलीच्या पालकांच्या तक्रारीनुसार भांडुप पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

शेअर करा