मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Murder News : मुंबई हादरली! "लंगडा" आसिफचा रक्तरंजित कहर – अॅक्टीव्हा धक्क्यावरून युवकावर चाकूहल्ला, पोलिसांच्या तडाख्यात खूनी जेरबंद!

"चाकू बाहेर, रक्त उडाले – आग्रीपाडा हादरले!"

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Murder News : मुंबई हादरली! "लंगडा" आसिफचा रक्तरंजित कहर – अॅक्टीव्हा धक्क्यावरून युवकावर चाकूहल्ला, पोलिसांच्या तडाख्यात खूनी जेरबंद!

"चाकू बाहेर, रक्त उडाले – आग्रीपाडा हादरले!"

Mumbai Latest Crime News : मुंबईच्या आग्रीपाडा भागात सोमवारी दुपारी थरकाप उडवणारी घटना घडली. संतोषी माता मंदिरासमोर किरकोळ अॅक्टीव्हा गाडीच्या धक्क्यावरून कुप्रसिद्ध आसिफ सलिम शेख उर्फ ‘लंगडा’ (२७) याने अक्षरशः रक्ताची होळी पेटवली.

प्रितम कवी उटकर (३०) हा युवक मंदिराजवळ उभा असताना "लंगडा" अचानक भडकला.
संतापाच्या भरात शिवीगाळ करत त्याने पॅन्टमधून धारदार चाकू काढला.
क्षणार्धात मानेवर, पोटावर, पाठीवर एकापाठोपाठ एक वार करून उटकरला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
रक्ताच्या थारोळ्यात बुडण्यापूर्वी पीडिताने कसाबसा जीव वाचवत पळ काढला!

आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांची शिताफी

हल्ल्यानंतर आरोपी लंगडा फरार झाला होता. मात्र गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या दोन विशेष पथकांनी १ ऑक्टोबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे भल्याभल्यांना चकवणारा सापळा रचत खूनी लंगड्याला बेड्या ठोकल्या.

आरोपीची गुन्हेगिरीची फाइल

लंगड्याच्या खात्यावर आधीच गंभीर गुन्ह्यांची मालिका –
🔸 सीएसटीएम रेल्वे – ०१
🔸 कल्याण रेल्वे – ०१
🔸 दादर रेल्वे – ०२
एकूण ४ गुन्ह्यांत आधीपासून आरोपी!

पुढील तपास धगधगत्या टप्प्यात
या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून, आरोपीचा मोठ्या गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.

शेअर करा