मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Kidnapping News : "उद्या 25 लाख रूपये अंगडिया मार्फत दे नाहीतर वडीलांना चाकुने भोकसुन मारील", व्यापाराचे अपहरण करणारे गजाआड

Mumbai Latest Kidnapping News : गुजरात येथून मुंबई येथे आलेल्या व्यापाऱ्याचे अपहरण, 24 तासांत कांदिवली येथून आरोपींना अटक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Kidnapping News : "उद्या 25 लाख रूपये अंगडिया मार्फत दे नाहीतर वडीलांना चाकुने भोकसुन मारील", व्यापाराचे अपहरण करणारे गजाआड

Mumbai Latest Kidnapping News : गुजरात येथून मुंबई येथे आलेल्या व्यापाऱ्याचे अपहरण, 24 तासांत कांदिवली येथून आरोपींना अटक

मुंबई :- बच्छाव रेल्वे स्टेशन, जिल्हा कच्छ गुजरात येथुन कच्छ एक्स्प्रेसने मुंबई येत असताना अपहरण झालेल्या व्यापाराची पोलिसांनी सुखरूप सुटका करून 24 तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे. Mumbai Latest Kidnapping News "उद्या 25 लाख रूपये अंगडिया मार्फत दे नाहीतर वडीलांना चाकुने भोकसुन मारील" अशी खंडणीकरीता धमकी दिली होती. या संदर्भात महेशकुमार केशवजी चौधरी (वय 42 रा.शारदादेवी चाळ प्रभात कॉलनी, सांताक्रुज पुर्व) यांनी वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अतिशय संवेदनशील व ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण केलेले असल्याने गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन मनीष कलवानिया पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-8, मुंबई,दौलत साळवे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकोला विभाग, मुंबई,प्रकाश खांडेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकोला पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी-अंमलदार यांवी 4 पोलीस तपास पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली.

तपास पथकांनी तांत्रिक व कौशल्यपुर्ण तपास करून तसेच गोपनीय माहीती काढुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न केले. गुन्हयातील आरोपी त्यांचे लोकेशन वांरवार बदलत होते, त्यानंतर देखील त्यांचा पाठलाग करत असताना त्यांना 26 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास लालजी पाडा, कांदिवली पश्चिम, मुंबई येथे जावुन गुन्हयातील खालील राधेश्याम मेवालाल सोनी (वय 30) आरोपी यास ताब्यात घेतले.आरोपीकडे केलेल्या तपासात त्याचे साथीदार हे गुन्हयात अपहरण केलेल्या व्यक्तीसोबत राममंदिर पश्चिम येथील एका इमारतीमध्ये ठेवल्याचे माहीती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून सतिश नंदलाल यादव (वय 33),धर्मेंद्र रामपती रविदास (वय 40) अटक केली असून पोलिसांनी केशवजी भीमाबाई चौधरी (वय 60) यांची सुखरूप सुटका केली आहे.

शेअर करा