मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Fraud News : 3 कोटींचे हिरे लंपास, गुजरातच्या व्यापाऱ्याची मुंबईत फसवणूक

Mumbai Diamond Fraud News : ग्राहक म्हणून आलेल्या व्यक्तीच्या साथीदारानेच हिरे पळवले,बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, फरार आरोपीचा शोध सुरू

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Fraud News : 3 कोटींचे हिरे लंपास, गुजरातच्या व्यापाऱ्याची मुंबईत फसवणूक

Mumbai Diamond Fraud News : ग्राहक म्हणून आलेल्या व्यक्तीच्या साथीदारानेच हिरे पळवले,बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, फरार आरोपीचा शोध सुरू

मुंबई :- गुजरात येथील एका हिरे व्यापाऱ्याचे तब्बल 3 कोटी रुपयांचे हिरे मुंबईत पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिऱ्यांच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने पाठवलेल्या व्यक्तीनेच हा अपहार केला असून, या प्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात Borivali Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Latest Crime News

गुजरातमधील सुरत येथे राहणारे हिरे व्यापारी शील कोरडिया (वय 21) यांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शील यांची वडिलोपार्जित 'लेल्सिंग डायमंड' नावाची कंपनी असून, ते अनेक शहरांमध्ये व्यवसाय करतात. त्यांचे नियमित ग्राहक चैतन्य मेहता यांनी सप्टेंबर महिन्यात त्यांच्याकडे 666.65 कॅरेटच्या हिऱ्यांची ऑर्डर दिली होती, ज्याची किंमत सुमारे 3 कोटी रुपये होती.

हे हिरे घेण्यासाठी चैतन्य मेहता यांनी त्यांचे परिचित जिमित आणि रकीन या दोघांना गुजरातमधील नवसारी येथे पाठवले. 6 सप्टेंबर रोजी त्यांनी शील कोरडिया यांच्या कंपनीतून हे हिरे ताब्यात घेतले. त्यानंतर, मेहता यांनी हे हिरे विक्रम संघवी याला मुंबईत घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार, जिमित आणि रकीन यांनी हे हिरे विक्रम संघवीला दिले.

मुंबईत हिरे पोहोचलेच नाहीत

हिरे घेऊन विक्रम संघवी मुंबईसाठी निघाला होता. मात्र, हे हिरे मुंबईत पोहोचलेच नाहीत. उलटपक्षी, विक्रम संघवीने त्याला हिरे मिळाले नसल्याचा दावा केला. पोलिसांनी तपास सुरू केल्यावर, विक्रम संघवीनेच हिऱ्यांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी, शील कोरडिया यांनी बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बोरीवली पोलिसांनी आरोपी विक्रम संघवी याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 316 (2) आणि 316 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे हिरे व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

शेअर करा