मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Drugs News : मुंबईत ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले! - एएनसीची धडक कारवाई; 4 कोटींहून अधिक किमतीचे 'हेरॉईन' आणि 'एमडी' जप्त, 10 तस्कर अटकेत

Mumbai Latest Drug News : बोरीवली ते धारावीपर्यंत 6 ठिकाणी छापे; तस्करांकडून 5 लाख 87 हजार रोख रक्कमही हस्तगत; अंमली पदार्थ विरोधी कक्षाची विक्रमी कामगिरी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Drugs News : मुंबईत ड्रग्स माफियांचे कंबरडे मोडले! - एएनसीची धडक कारवाई; 4 कोटींहून अधिक किमतीचे 'हेरॉईन' आणि 'एमडी' जप्त, 10 तस्कर अटकेत

Mumbai Latest Drug News : बोरीवली ते धारावीपर्यंत 6 ठिकाणी छापे; तस्करांकडून 5 लाख 87 हजार रोख रक्कमही हस्तगत; अंमली पदार्थ विरोधी कक्षाची विक्रमी कामगिरी

मुंबई :- अंमली पदार्थांचे मोठे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दिशेने बृहन्मुंबई पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. बोरीवली पूर्व, खार, बांद्रा पश्चिम, धारावी आणि गोरेगाव यांसारख्या प्रमुख ठिकाणांसह एकूण सहा ठिकाणी छापे टाकून पोलिसांनी 4 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्स जप्त केले असून, 10 ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. Mumbai Latest Drug News

या कारवाईत एकूण 739 ग्रॅम वजनाचा 'हेरॉईन' आणि 452 ग्रॅम वजनाचा 'एम. डी.' (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. केवळ अंमली पदार्थच नव्हे, तर तस्करांकडून 5 लाख 87 हजार इतकी मोठी रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

एएनसीच्या कांदिवली युनिटने बोरीवली आणि गोरेगाव परिसरातून सर्वाधिक अंमली पदार्थ जप्त केले. यामध्ये सुमारे 2.53 कोटी रुपये किमतीचे हेरॉईन आणि 57.50 लाख किमतीचा एमडीचा समावेश आहे. तर बांद्रा, आझाद मैदान आणि वरळी युनिटनेही बांद्रा, धारावी आणि गोरेगाव पश्चिम परिसरातून लाखो रुपयांचे हेरॉईन आणि एमडी जप्त करून तस्करांना जेरबंद केले आहे.

बृहन्मुंबई पोलिसांनी एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि महत्त्वाच्या ठिकाणी कारवाई करून शहर अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी आपण किती कटिबद्ध आहोत, हे दाखवून दिले आहे.

शेअर करा