मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Drugs News : पवईतील रंगाच्या गोदामात ड्रग्जचा कारखाना उघडकीस!

Mumbai Sakinaka Police Busted Drug Racket In Powai : साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई: 44 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; म्हैसूर कनेक्शनही समोर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Drugs News : पवईतील रंगाच्या गोदामात ड्रग्जचा कारखाना उघडकीस!

Mumbai Sakinaka Police Busted Drug Racket In Powai : साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई: 44 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; म्हैसूर कनेक्शनही समोर

मुंबई :- मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने साकीनाका पोलीस ठाण्याच्या Sakinaka Police Station हद्दीत एका मोठ्या अंमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. Mumbai Drug Racket पवईतील हिरानंदानी येथील 'प्रथमेश गॅलेक्सी' या इमारतीत रंगाच्या गोदामाच्या नावाखाली चालणाऱ्या एका दुकानातून पोलिसांनी तब्बल 43 कोटी 80 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि ते बनवण्यासाठी लागणारे रसायन जप्त केले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. Mumbai Police Latest Crime News

या प्रकरणाची सुरुवात 24 एप्रिल 2025 रोजी साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यापासून झाली. अंमली पदार्थ विकण्यासाठी आलेल्या तीन आरोपींना अटक करून पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील वसई येथील कामण गावातून 8.04 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज आणि ते बनवण्याचे साहित्य जप्त केले होते. या गुन्ह्याच्या पुढील तपासात पोलिसांनी म्हैसूर, कर्नाटक येथून एका आरोपीला 26 जुलै रोजी अटक केली.

या आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी 30 जुलै रोजी पवई येथील 'प्रथमेश गॅलेक्सी' येथील शॉप क्रमांक 9 वर छापा टाकला. या दुकानात रंगाचे गोडाऊन असल्याचा बनाव केला जात होता, मात्र आतमध्ये पोलिसांना 21.903 किलो वजनाचे एमडी ड्रग्ज, तसेच 159 किलो '2 Bromo 4 Methyl Propiophenon' आणि 376 किलो 'Monomithilamine' ही एमडी बनवण्यासाठी लागणारी रसायने आढळून आली. जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 44 कोटी रुपये आहे.

Indian Police Service (IPS) officer Deven Bharti is appointed as the new commissioner of Mumbai police

पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त परमजितसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदिप मैराळे यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे. या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद वणवे, पोलीस उपनिरीक्षक पंकज परदेशी, पोलीस हवालदार चंद्रकांत पवार, नितीन खैरमोडे, अनिल करांडे यांचा समावेश होता.

शेअर करा