मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Breaking News : महिला डॉक्टर बाथरुममध्ये अंघोळ करत होती, सफाई कामगार करत होता व्हिडिओ, पोलिसांनी केली ही कारवाई

Mumbai Breaking News : महिला डॉक्टर आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी बीएमसी रुग्णालयाच्या सफाई कामगाराला अटक केली आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Breaking News : महिला डॉक्टर बाथरुममध्ये अंघोळ करत होती, सफाई कामगार करत होता व्हिडिओ, पोलिसांनी केली ही कारवाई

Mumbai Breaking News : महिला डॉक्टर आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवल्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी बीएमसी रुग्णालयाच्या सफाई कामगाराला अटक केली आहे. आरोपी 10 वर्षांहून अधिक काळ रुग्णालयात कार्यरत आहे.

मुंबई :- कांदिवली पोलिसांनी Kandivali Police बीएमसी रुग्णालयात BMC Ward काम करणाऱ्या 40 वर्षीय सफाई कामगाराला अटक केली आहे. सफाई कामगाराने महिला डॉक्टर आंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ बनवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश सोलंकी असे आरोपी सफाई कामगाराचे नाव आहे. तक्रारदार महिला डॉक्टर रुग्णालयातून एमएसचे शिक्षण घेत असून गेल्या दोन वर्षांपासून बीएमसी रुग्णालयात प्रॅक्टिस करत आहेत.

ही घटना मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास घडल्याचे फिर्यादी महिला डॉक्टरने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले. ती तिच्या खोलीच्या बाथरुममध्ये आंघोळ करत असताना आरोपी जयेश सोळंकी याने तिचा फोन खिडकीवर ठेवला आणि तिचे रेकॉर्डिंग सुरू केले. हा मोबाईल डॉक्टरांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ रुग्णालयाच्या आवारातील इतरांना व वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आरोपीला पकडून त्याचा मोबाईल काढून घेतला. सोळंकी हे 10 वर्षांहून अधिक काळ त्या रुग्णालयात कार्यरत आहेत.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा फोन तपासला गेला तेव्हा त्यांना व्हिडिओ सापडला, त्यानंतर कांदिवली पोलिस ठाण्यामध्ये BNS च्या कलम 77 अंतर्गत जयेश सोळंकी विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे असुन आरोपी जयेश याला अटक करण्यात आली. हा जामीनपात्र गुन्हा असल्याने आरोपीला पोलीस ठाण्यातूनच जामीन मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले, त्यानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली. आरोपी सोळंकी आपल्या परिवारासोबत बोरिवली परिसरात राहतो.

हेही वाचा: Mumbai Illegal Sex racket Busted : भाईंदर परराज्यातील महिलांकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दलाल महिलेला अटक, तीन मुलींची सुटका

शेअर करा