मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai BMC Election : मुंबईचा महापौर ‘खान’ होणार? भाजपच्या वक्तव्यावरून मुंबईत राजकारण तापले

Mumbai BMC Election Latest Update : अमित साटम यांच्या टीकेनंतर शिवसेना (उबाठा) आणि मनसे आक्रमक; ‘मराठी महापौर शिवसेनेचाच असेल’, संजय राऊतांचा पलटवार,‘खान’ची भीती दाखवून ‘भैय्या-गुज्जु’ महापौर करण्याचा कट?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai BMC Election : मुंबईचा महापौर ‘खान’ होणार? भाजपच्या वक्तव्यावरून मुंबईत राजकारण तापले

Mumbai BMC Election Latest Update : अमित साटम यांच्या टीकेनंतर शिवसेना (उबाठा) आणि मनसे आक्रमक; ‘मराठी महापौर शिवसेनेचाच असेल’, संजय राऊतांचा पलटवार,‘खान’ची भीती दाखवून ‘भैय्या-गुज्जु’ महापौर करण्याचा कट? भाजपच्या नवनाथ बान यांचाही शिवसेना-मनसेला टोला

मुंबई :- पाच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागताच मुंबईतील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, भाजपने केलेल्या एका वक्तव्याने मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. Mumbai Latest News

वरळी डोम येथे एका कार्यक्रमात बोलताना भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. "जर ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली, तर महापौर 'खान' असेल," असे वक्तव्य त्यांनी केले. यानंतर शिवसेना (उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत यांचा पलटवार

अमित साटम यांच्या वक्तव्यावर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. "अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केले? आरिफ मोहम्मद खानांना पदे कुणी दिली? या देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत भाजप नव्हता. पण मुस्लिम समाज होता. अमित साटम यांनी याबाबत जरा अभ्यास करावा," असे राऊत म्हणाले. तसेच, "मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो शिवसेनेचा असेल," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मनसे आणि भाजपमध्येही शाब्दिक युद्ध

मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही या वादात उडी घेत भाजपवर निशाणा साधला. "मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे. 'खान'ची भीती दाखवून 'भैय्या' आणि 'गुज्जु' महापौर करण्याचा कट उधळून लावणार," असे ते म्हणाले.

याला प्रत्युत्तर देताना भाजप नेते नवनाथ बान म्हणाले, "मराठी माणसाच्या हक्कांसाठी भाजपने नेहमीच लढा दिला आहे. त्यामुळे आम्हाला कुणाकडून काही शिकायची गरज नाही. पतपेढीच्या निवडणुकीत कोण जिंकले आणि कोण हळकुंडाने पिवळे झाले, हे मुंबईकरांनी पाहिले आहे. महापालिका निवडणुकीत मराठी माणूस तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाही, तर तो विकासाला मत देणार आहे. त्यामुळे महापौर मराठीच होईल, पण तो भाजप-महायुतीचा असेल."

शेअर करा