मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai BMC Election : मुंबई महापालिका निवडणूक: भाजपचे 'मराठी' कार्ड की 'सर्वसमावेशक' चेहरा? ठाकरे बंधूंच्या आरोपांना यादीतून उत्तर

Mumbai BMC ELECTION Latest News : मराठी मतदारांना साद, उत्तर भारतीयांना झुकते माप आणि गुजराती टक्क्यावरही लक्ष; भाजपची संतुलित पहिली यादी

V
Vivek

2 मिनिट वाचन

Uddhav Thackeray

Mumbai BMC ELECTION Latest News : मराठी मतदारांना साद, उत्तर भारतीयांना झुकते माप आणि गुजराती टक्क्यावरही लक्ष; भाजपची संतुलित पहिली यादी

मुंबई | "मुंबईवर दोन गुजरात्यांचा डोळा आहे," असे विधान करत उद्धव ठाकरेंनी 'मराठी विरुद्ध गुजराती' वादाची ठिणगी टाकली असताना, भारतीय जनता पक्षाने आपली पहिली यादी जाहीर करून राजकीय समीकरणांना वेगळे वळण दिले आहे. भाजप मराठीविरोधी असल्याचा नरेटिव्ह मोडीत काढण्यासाठी भाजपने आपल्या 67 उमेदवारांच्या यादीत निम्म्याहून अधिक मराठी चेहऱ्यांना स्थान दिले आहे.

उत्तर भारतीय उमेदवारांवर मोठी मदार

मुंबईतील उत्तर भारतीय मतदार हा भाजपचा पारंपारिक आणि मोठा आधारस्तंभ मानला जातो. मनसे महाविकास आघाडीसोबत (ठाकरे गटासोबत) गेल्यामुळे काँग्रेसने ठाकरेंची साथ सोडली आहे, ज्याचा थेट फायदा मिळवण्यासाठी भाजपने 11 उत्तर भारतीय उमेदवारांना पहिल्याच यादीत संधी दिली आहे.

प्रमुख उमेदवार

वॉर्ड क्रमांक 69 - सुधा सिंह (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 13 - राणी त्रिवेदी (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 23 - शिवकुमार झा (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 24 - स्वाती जैस्वाल (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 31 - मनिषा यादव (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 36 - सिद्धार्थ शर्मा (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 43 - विनोद मिश्रा (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 68 - रोहन राठोड (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 72 - ममता यादव (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 122 - चंदन शर्मा (उत्तर भारतीय)
वॉर्ड क्रमांक 185 - रवी राजा (उत्तर भारतीय)

गुजराती मतांचे गणित आणि किरीट सोमय्यांचा वारस

भाजपच्या पहिल्या यादीत जवळपास 10 टक्के उमेदवार गुजराती आहेत. एकूण 67 पैकी 6 उमेदवार गुजराती समाजातील असून, यात माजी खासदार किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांची उमेदवारी चर्चेत आहे.

गुजराती चेहरे:

वॉर्ड क्रमांक 10 - जितेंद्र पटेल (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 15 - जिग्ना शाह (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 58 - संदीप पटेल (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 97 - हेतल गाला (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 107 - नील सोमय्या (गुजराती)
वॉर्ड क्रमांक 174 - साक्षी कनोजिया (गुजराती)

मराठी कार्डाला मिळालेले उत्तर

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला असला तरी, भाजपने मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर, संतोष ढोले, अजय पाटील आणि प्रभाकर शिंदे यांसारख्या आक्रमक मराठी नेत्यांना उमेदवारी देऊन "आम्हीही मराठीच आहोत" असा संदेश दिला आहे. पहिल्या यादीत मराठी उमेदवारांची संख्या सर्वाधिक असून, ती ठाकरेंच्या दाव्याला आव्हान देणारी ठरली आहे.

'ठाकरे बंधू' विरुद्ध 'महायुती'

मुंबईच्या 227 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत 114 हा बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी दोन्ही गट आता भाषिक ध्रुवीकरणाचा वापर करत आहेत. जिथे ठाकरे गटाने मराठी अस्मितेचा आधार घेतला आहे, तिथे भाजपने 'सर्वसमावेशक मुंबई' असे चित्र रंगवत उत्तर भारतीय, गुजराती आणि मराठी अशा तिन्ही घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे.

शेअर करा