मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Bike Robbery Case : मुंबईत 'ॲक्टिव्हा' चोराचा सुळसुळाट! सीसीटीव्हीच्या जाळ्यात अडकला 18 वर्षीय तरुण; मालाड पोलिसांनी 3.5 लाखांच्या 5 गाड्या केल्या जप्त

Mumbai Malad Activa Bike Robbery Case : 50 सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन रात्रींचा पाळत; मालाड, जोगेश्वरी व व्ही.व्ही.

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Bike Robbery Case : मुंबईत 'ॲक्टिव्हा' चोराचा सुळसुळाट! सीसीटीव्हीच्या जाळ्यात अडकला 18 वर्षीय तरुण; मालाड पोलिसांनी 3.5 लाखांच्या 5 गाड्या केल्या जप्त

Mumbai Malad Activa Bike Robbery Case : 50 सीसीटीव्ही कॅमेरे आणि दोन रात्रींचा पाळत; मालाड, जोगेश्वरी व व्ही.व्ही. नगरमधील वाहन चोरीचे गुन्हे उघड

मुंबई/मालाड | मुंबईच्या पश्चिम उपनगरातून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला जेरबंद करण्यात मालाड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश आले आहे. केवळ 18 वर्षे वय असलेल्या या आरोपीने गेल्या पाच-सहा महिन्यांत मालाड, जोगेश्वरी आणि विनोबा भावे नगर परिसरात धुमाकूळ घातला होता. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे त्याला मालवणी परिसरातून अटक करून 3 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 5 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. Mumbai Malad Bike Robbery Case

एका चोरीने उघडले गुन्ह्यांचे धागेदोरे

20 डिसेंबर 2025 रोजी मालाड पश्चिम येथील क्लाउड नाईन हॉस्पिटलसमोरील गल्लीतून एक 'ॲक्टिव्हा' दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे आणि त्यांच्या टीमने घटनास्थळापासून चोरट्याने ज्या मार्गाने पळ काढला, त्या मार्गावरील तब्बल 40 ते 50 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.

मालवणीच्या दिशेने जाताना दिसला संशयित

सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले असता, प्रत्येक वेळी 'होन्डा ॲक्टिव्हा' चोरणारा इसम एकच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनाचे आले. तो चोरीची गाडी घेऊन मालवणीच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर दोन दिवस आणि दोन रात्री पोलिसांनी मालवणी परिसरात सापळा रचला. खास खबऱ्यांच्या मदतीने पाळत ठेवली असता, 18 वर्षीय प्रथम सुरेंद्र बोम्मा हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पाच महिन्यात अनेक गाड्यांवर मारला डल्ला

आरोपी प्रथम बोम्मा याने गेल्या 5-6 महिन्यांत मालाडमधून दोन, विनोबा भावे नगरमधून एक आणि जोगेश्वरी परिसरातून एक अशा अनेक गाड्या चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून पोलिसांनी 5 सिल्व्हर, पांढऱ्या आणि ग्रे रंगाच्या ॲक्टिव्हा स्कूटर्स जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे मालाड, जोगेश्वरी आणि विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यांतील एकूण चार गुन्ह्यांची यशस्वी उकल झाली आहे.

पोलिस पथकाची कौतुकास्पद कामगिरी

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शशि कुमार मीना, पोलीस उप-आयुक्त संदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक तुषार सुखदेवे यांच्यासह अंमलदार संतोष सातवसे, अमित गावड, अविनाश जाधव, महेश डोईफोडे आणि वैभव थोरात यांचा समावेश होता.

शेअर करा