मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Police : फार्मा अकॅडमी च्या वार्षिक स्नेहसंमेलनात सायबर सेलच्या वतीने सायबर जनजागृती कार्यशाळा!

Mira Road Police Latest News : फार्मा अकॅडमी यांच्याकडुन सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mira Road Police : फार्मा अकॅडमी च्या वार्षिक स्नेहसंमेलनात सायबर सेलच्या वतीने सायबर जनजागृती कार्यशाळा!

Mira Road Police Latest News : फार्मा अकॅडमी यांच्याकडुन सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

मिरा रोड :- सायबर सेलच्या वतीने येथील फार्मा अकॅडमी यांना सायबर गुन्हे, स्वसंरक्षण प्रतिकारपर मार्गदर्शन आणि फार्मा अकॅडमी लता मंगेशकर ऑडिटीरियम काशिमिरा येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलिस कामकाज कसे चालते याची माहिती देण्यात आली. Mira Road Police Latest News

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

यानंतर रस्ता सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध, लहान मुले व महिलांवर होणारे अत्याचार, पोलिस कायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. सायबर विषयक जनजागृतीबाबत पोलीस उप निरीक्षक प्रसाद शेनोळकर (सायबर पोलीस ठाणे) यांनी कार्यक्रमाकरीता उपस्थित असलेल्या 20 ते 60 वयोगटातील शिक्षकेत्तर कुंद व इतर नागरीकांना सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया या संदर्भात फेसबुक, व्हॉटसॲप, इंस्टाग्राम, टिकटॉक या ॲप्लिकेशनचा वापर करताना काय खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन देण्यात आले आहे.

यावेळी 21 ते 65 वयोगटातील एकूण 35 शिक्षकेत्तर आणि 300 विद्यार्थी हजर होते. तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित शिक्षक व नागरीकांना दैनंदिन जिवनात इंटरनेटच्या माध्यामातुन होणारे आर्थिक व्यवहार व सोशल मिडीया संदर्भात आपण कसे सुरक्षित राहावे याबाबत महत्त्वपूर्ण अश्या सुचना देण्यात आल्यात. सायबर गुन्हे जनजागूतीबाचत पत्रक चाटप करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, तसेच कार्यक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.

फार्मा अकॅडमीचे अध्यक्ष जयप्रकाश प्रजापती यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम यशस्वी झाला आहे. मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी मार्गदर्शन केले आहे.

शेअर करा