मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Crime News : मीरा रोड येथे बांगलादेशी महिलांना अटक, आश्रय देणाऱ्या मालकाविरोधातही गुन्हा दाखल

Mira Road Crime Branch Arrested Illegal Bangladeshi Migrant : पांडुरंगवाडी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत बांगलादेशी महिलाची धरपकड केली आहे.

V
Vivek

2 मिनिट वाचन

Mumbai Angadia Firing News

Mira Road Crime Branch Arrested Illegal Bangladeshi Migrant : पांडुरंगवाडी येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत बांगलादेशी महिलाची धरपकड केली आहे. बांगलादेशी महिलाना आसरा देणाऱ्या मालकाविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरा रोड :- मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अवैधरित्या राहत असेल्या बांगलादेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. Mira Road Crime Branch Arrested Illegal Bangladeshi Migrant पोलीस प्रशासनाने बांगलादेशी नागरिकांची शोधमोहीम गांभीर्याने सुरू केली होती. डेल्टा म्हाडा बिल्डींगचे समोर, पाडुरंगवाडी, काशिमीरा येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत बांगलादेशी महिलाची धरपकड केली आहे. बांगलादेशी महिलाना आसरा देणाऱ्या मालकाविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात Kashmira Police Station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापळा रचुन बांगलादेशी महिला पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेवून तिचेकडे केलेल्या चौकशीत, ति स्वतः बांगलादेशी नागरीक असुन सुध्दा तिने खोट्या कागदपत्रांचे आधारे भारतीय आधारकार्ड, भारतीय निवडणुक आयोगाचे मतदान ओळखपत्र बनवून त्याचा वापर केला. तसेच आरोपी मालक यास नमुद महिला हि बांगलादेशी नागरीक असल्याचे माहित असतांना देखील तिला बेकायदेशीर वास्तव्यासाठी आश्रय दिलाने त्यांना ताब्यात घेण्यात आले. सदर बाबत दोन पंचासमक्ष पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे यांनी सविस्तर पंचनामा केला आहे. ताब्यात घेतलेल्या महिला बांगलादेशी व तिस सहारा देणारा इसम यांच्या विरुध्द महिला पोलीस हवालदार निशिगंधा मांजरेकर यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने काशिमीरा पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करुन भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318,336 (2), 340 (2) सह पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3,4 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 7,13,14-अ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, अनिल पवार, रामचंद्र पाटील, राजाराम आसावले, शिवाजी पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई चेतनसिंग राजपुत,केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार निशीगंधा मांजरेकर, महिला पोलीस शिपाई तृशा कटकधोंड व पोलीस हवालदार सम्राट गावडे यांनी केली आहे.

शेअर करा