मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Road Crime News : ऑनलाईन फसवणुकीतून गेलेली 1.37 लाखांची रक्कम परत ; सायबर पोलिसांच्या पाठपुरावाला यश

Mira Bhayandar Cyber Crime News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या सायबर पोलिसांची कामगिरी, मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम सायबर पोलिसांच्या पाठपुरावाने मूळ खात्यात परत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mira Road Crime News : ऑनलाईन फसवणुकीतून गेलेली 1.37 लाखांची रक्कम परत ; सायबर पोलिसांच्या पाठपुरावाला यश

Mira Bhayandar Cyber Crime News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलिसांच्या सायबर पोलिसांची कामगिरी, मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम सायबर पोलिसांच्या पाठपुरावाने मूळ खात्यात परत

मिरा रोड :- मिरा रोड पोलीस ठाण्याच्या Mira Road Police News हद्दीतील राहणाऱ्या चव्हाण यांची 1 लाख 37 हजारांची ऑनलाईन फसवणुक झाली होती. Cyber Fraud याबाबत चव्हाण यांनी सायबर पोलिसांनी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी संबंधीत तक्रारदाराच्या खात्यात 1 लाख 37 हजार इतकी रक्कम परत मिळवून दिली आहे.

मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चव्हाण यांची ऑनलाईन फसवणूक एका फेक लिंक वरून झाली होती. त्यांनी ती लिंक ओपन केली असता त्यांच्या बँक खात्यातून एक लाख 37 हजार रुपये इतर कोणत्यातरी खात्यात वळविले. चव्हाण यांची ऑनलाइन फसवणूक केली होती. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चव्हाण यांनी तात्काळ सायबर पोलिसांची संपर्क करून लेखी तक्रार दाखल केली होती.

सायबर पोलिसांनी माहितीच्या आधारे पोर्टल कोणाचे याची माहिती प्राप्त करून चव्हाण यांच्या खात्यातून वळवलेली रक्कम ज्या वॅलेटमध्ये जमा झाली. त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याला तात्काळ मेल पाठवत सदर रक्कम परत करणेबाबत कळविले. तसेच संबंधीत वॅलेटला पाठपुरावा करुन तक्रारदार यांचे फसवणुकीद्वारे वळविलेली रक्कम तक्रारदार चव्हाण यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती वॅलेट नोडल अधिकारी यांनी पोलिसांना दिली आहे. सायबर पोलिसांच्या या तात्परतेमुळे पैसे परत मिळाल्यामुळे तक्रारदार चव्हाण यांनी समाधान व्यक्त केला आहे.

Avinash-Ambure

पोलीस पथक
अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, सहाय्यक फौजदार मिनाग्रीस फर्नाडिस, पोलीस अंमलदार सावन शेवाळे, ओकार डोंगरे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे.

शेअर करा