मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 च्या हद्दीत "ऑपरेशन ऑल आउट"

Mira Bhayandar Police Mission All Out : ऑपरेशन ऑल आउट, कोबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांकडून मोठ्या कारवाया, 5 तडीपार आरोपींना अटक!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 च्या हद्दीत "ऑपरेशन ऑल आउट"

Mira Bhayandar Police Mission All Out : ऑपरेशन ऑल आउट, कोबिंग ऑपरेशनमध्ये पोलिसांकडून मोठ्या कारवाया, 5 तडीपार आरोपींना अटक!

मिरा रोड :- राज्यात राजकीय रणधुमाळी उडाली असतानाही यंत्रणा मात्र सतर्क आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठा पोलीस फौजफाटा बंदोबस्ता करिता मैदानात उतरला आहे. पोलिसांकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या कारवाई केल्या जात आहे. अशीच कारवाई मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 Mira Bhayandar Police हद्दीत पोलिसांनी "ऑपरेशन ऑल आऊट", कोंबिंग ऑपरेशन Mission All Out अंतर्गत मोठी कारवाई करत पाच तडीपार Mira Bhayandar Tadipar Criminal Arrested आरोपी अटक केली आहे.

पोलीस यंत्रण

मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय व परिमंडळ-1 अधिनस्त विभागीय 3 सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक 14, सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक- 38 व पोलीस अंमलदार 140 यांनी सदर कारवाईत मोठा फौजफाटा तैनात होता.

ऑल आउट कोबिंग ऑपरेशन, कारवाई!

ऑल आउट कोबिंग ऑपरेशन दरम्यान पाहीजे/फरारी 7 आरोपीत मिळून आले त्यांना ताब्यात घेवून कारवाई करण्यात आलेली आहे एन.डी.पी.एस, कायदयान्वये अंमली पदार्थाचे सेवन केल्याबाबत 7 इसमावर केसेस करण्यात आल्या, 7 इसमावर बी.एन.एस.एस. प्रमाणे प्रतिबंधत्मक कारवाई करण्यात आली, दारुबंदी कायद्यान्वये 10 गुन्हे दाखल करण्यात आले, कोप्ता अंतर्गत 2 एन.सी. दाखल केल्या, 12 हिस्ट्रीशिटर तपासले, 05 तडीपार इसमाना तपासले, 51 हॉटेल व लॉजेस तपासले. 7 पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. नाकाबंदीच्या वेळी मोटार वाहन कायदया अन्वये 44 केसेस करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Sanjay Raut : महाराष्ट्राचे राजकारण कोणी गलिच्छ केले? भाजप नेते शरद पवारांबाबत असं काही बोलले, संजय राऊत संतापले

शेअर करा