मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Meenakshi Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांचा कट; नगरसेविका मीनाक्षी शिंदेंचे गंभीर आरोप

•प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा; राम पूर्णेकर आणि कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Meenakshi Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांचा कट; नगरसेविका मीनाक्षी शिंदेंचे गंभीर आरोप

•प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा; राम पूर्णेकर आणि कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी

ठाणे :- प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोवण्यासाठी आणि त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांकडून मोठा कट रचण्यात येत असल्याचा खळबळजनक आरोप शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. पूर्णेकर हत्याकांडाला वेगळे वळण देण्यासाठी आणि काही अघटित घडवून आणत त्याचे खापर सत्ताधाऱ्यांवर फोडण्यासाठी विरोधकांच्या बैठका सुरू असल्याचा दावा त्यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

पूर्णेकर कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणात पूर्णेकर कुटुंबीयांकडून सतत आपल्यावर आणि पती राजेंद्र शिंदे यांच्यावर आरोप केले जात असतानाच, मीनाक्षी शिंदे यांनी मात्र राम पूर्णेकर, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या जीविताला धोका असल्याचे सांगत त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे. तसेच, आदित्य ठाकरे, संजय राऊत, राजन विचारे यांच्यासह काही विरोधी नेते या हत्याकांडाचा राजकीय स्वार्थासाठी वापर करत असून जनआंदोलनाच्या नावाखाली बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचा आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.

उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार टीका

यावेळी बोलताना मीनाक्षी शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही कडक शब्दांत ताशेरे ओढले. आनंद दिघे यांच्या निधनाचा संदर्भ देत, दिघे यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यास वेळ न मिळालेले उद्धव ठाकरे आता राजकारण करण्यासाठी मानपाडा येथे आल्याची टीका त्यांनी केली. तसेच, त्यांना खासदार, आमदार व पदाधिकारी टिकवता आले नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, मीनाक्षी शिंदे यांच्या या भेटीदरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस आयुक्तालयाचे मुख्य प्रवेशद्वार काही वेळ बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले गेले.

हेही वाचा: Pune News : जुनी मानसिकता असती तर पुण्यातील मेट्रोला आणखी दशके लागली असती"; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर जोरदार घणाघात

शेअर करा