मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Malad Fire News : मुंबईत आगीचे सत्र कायम; मालाडमधील कॉल सेंटर युनिटमध्ये भीषण आग

Malad Call Center Fire News : 'फोर डायमेंशन' इमारतीच्या पाचव्या मजल्यावर मध्यरात्री दुर्घटना; 15 हजार चौ.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Malad Fire News : मुंबईत आगीचे सत्र कायम; मालाडमधील कॉल सेंटर युनिटमध्ये भीषण आग

Malad Call Center Fire News : 'फोर डायमेंशन' इमारतीच्या पाचव्या मजल्यावर मध्यरात्री दुर्घटना; 15 हजार चौ. फूट क्षेत्रातील साहित्य जळून खाक

मुंबई :- मुंबई शहरात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, मालाड (पश्चिम) येथील लिंक रोडवरील 'फोर डायमेंशन' या व्यावसायिक इमारतीत गुरुवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका कॉल सेंटर युनिटमध्ये ही आग लागली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. Malad Latest Fire News

नेमकी घटना काय?

गुरुवारी मध्यरात्री 12.45 वाजण्याच्या सुमारास 'फोर डायमेंशन' इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागली. आग क्षणातच वाढत गेल्यामुळे मुंबई अग्निशमन दलाने या आगीला 'दोन क्रमांकाची' वर्दी दिली. पाचव्या मजल्यावर असलेल्या सुमारे 15 हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या कॉल सेंटर युनिटमधील विद्युत वाहिन्या, विद्युत यंत्रणा, लाकडी फर्निचर, पार्टिशन, फॉल्स सीलिंग, संगणक (कम्प्युटर्स) आणि सर्व्हर रूममधील साहित्य या आगीत जळून खाक झाले.

नियंत्रणात अडथळे

आग लागल्यामुळे संपूर्ण इमारतीत मोठ्या प्रमाणात धुराचे साम्राज्य पसरले होते. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळविण्यात सुरुवातीला अडथळे येत होते. अखेर, जवानांनी इमारतीच्या काचेची तावदाने फोडली, ज्यामुळे धूर बाहेर पडला आणि अग्निशमन दलाला काम करणे सोपे झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात अग्निशामक गाड्या, रुग्णवाहिका, पाण्याचे टँकर आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणून पूर्णतः विझवण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 वाजता आग पूर्णपणे विझली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शेअर करा