मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Maharashtra Political Update : महापालिका निवडणुकीपूर्वी 'बविआ'ला फुटीचे ग्रहण!

Vasai BVA Member Joined BJP : 3 दशकांचे वर्चस्व संकटात; बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

V
Vivek

1 मिनिट वाचन

Maharashtra Political Update : महापालिका निवडणुकीपूर्वी 'बविआ'ला फुटीचे ग्रहण!

Vasai BVA Member Joined BJP : 3 दशकांचे वर्चस्व संकटात; बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

वसई - विरार :- आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई-विरारच्या राजकारणात तीन दशकांहून अधिक काळ आपले वर्चस्व टिकवून ठेवणाऱ्या बहुजन विकास आघाडी (बविआ) समोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. बविआला आता 'फुटीचे ग्रहण' लागले असून, एकापाठोपाठ एक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत असल्याने बविआसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. Maharashtra Latest Political Update

भाजपची सक्रियता वाढली

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजप वसई-विरारमध्ये चांगलीच सक्रिय झाली आहे. आगामी पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विरोधी पक्ष असलेल्या बविआचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक यांना आपल्याकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

माजी नगरसेवकासह कार्यकर्त्यांचा प्रवेश:

वसई पश्चिम नुकताच वसई पश्चिमेतील विशालनगर येथील बविआचे माजी नगरसेवक प्रदीप पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार स्नेहा दुबे पंडित यांची उपस्थिती होती.

नालासोपारा (सोपारा गाव). यापाठोपाठ नालासोपारा येथील सोपारा गावातील बविआचे प्रमुख कार्यकर्ते मोहक पाटील, सचिन देसाई, नितीन देसाई, निवास रहाटे, हितेश पाटील, हितेश निर्मल, जितेंद्र मेहता अशा 40 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, मनोज पाटील आणि मनोज बारोट उपस्थित होते.

निवडणुकीच्या तोंडावर बविआचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपमध्ये सामील होत असल्याने, स्थानिक राजकारणावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता असून, बविआच्या स्थानिक वर्चस्वाला भाजप आव्हान देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शेअर करा